शहादा Shahada । ता.प्र.-
भगवा रंग (Saffron color) परिधान केल्यानंतर शक्ती आणि स्फूर्तीची (strength and vigor) अनूभूती येते. आत्मसन्मान प्राप्त होतो. आजही देशात शिक्षणाची कमी जाणवते. शिक्षणाच्या कमतरतेमुळेच अनेक समाजातील मागासलेले विचार (backward thinking) पुसले गेलेले नाहीत. जीवनात प्रत्येक संकटाला तोंड दिले, संघर्ष केला, त्या संघर्षातूनच आज मला भगव्या रंगाने देशात आत्मसन्मान प्राप्त करून दिला, असे मत ये भगवा रंग या सुप्रसिद्ध भजनाच्या गायिका शहनाझ अख्तर (Bhajan singer Shahnaz Akhtar) यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.
कोण होणार अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती ?VISUAL STORY : परिणीती चोप्राने केली नव्या आयुष्याची सुरूवात, भर कार्यक्रमातील ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
आ.राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्ताने येथील खरेदी विक्री संघाच्या प्रांगणात शहनाझ अख्तर यांचा भजन गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
VISUAL STORY # मानसी नाईक पुन्हा नववधू ?जळगावच्या म्हाळसेची ही आहे VISUAL STORY, स्टोरीत नथीचा नखरा करतोय सर्वाना घायाळ
मूळच्या बरघाट (मध्यप्रदेश)येथील रहिवासी असलेल्या शहनाज अख्तर पुढे बोलतांना म्हणाल्या, मला लहानपणापासून गणपती, जय अंबे, महादेव यांच्या भजनांची आवड होती. श्री गणेश मंदिरातून भजन गायनाची प्रेरणा मिळाली, मात्र आम्ही मुस्लिम समाजातील असल्याने माझे भजन गाणे समाजाला मान्य नव्हते. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आमच्या विरोधात फतवाही काढण्यात आला. तरीही भजन गायन सोडले नाही. त्याचा सूड म्हणून समाजातील काहींनी प्रार्थनास्थळाजवळ असणार्या माझ्या घरावर दगडफेक करीत मला व माझ्या आजी, आजोबाला घरातून बाहेर काढले. त्यावेळी दंगलही झाली होती. परंतू कोणीही मदतीला आले नाही.
सातपुडा भागात वन्य प्राण्यांची अवस्था बिकट VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरणमुख्य जलवाहिनीवर नळ कनेक्शन असणार्यास पाचपट पाणीपट्टी
लहानपणी माझ्यावर मोठे संकट कोसळले आणि इथूनच माझ्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली. 2005 मध्ये माझा पहिला अल्बम रिलीज झाला होता. मी एक चांगली भजन गायिका झाली. माझे सर्वच भजन भाविकांना आवडतात. सतत दहा ते पंधरा वर्ष संघर्ष केला. आजही मी मोठ्या संकटांचा सामना करीत आहे. मात्र संकटानेच मला आयुष्यात जगण्याची नवी दिशा दिली. माझ्यावर समाजातून टीका केली जाते परंतू मी अशा टीकांना घाबरत नाही.
एलसीबी अॅक्शन मोडवर, दोन गुन्ह्याचा छडाउभ्या ट्रकला आयशरची धडक : एक ठार…
भगवा रंगाचे माझ्यासाठी अनन्यसाधारण महत्व आहे. भगवा रंग परिधान केल्यानंतर एक वेगळी उर्जा मला मिळते. देशात सनातन धर्म आहे, बाकी सर्व पंथ आहेत, ग्रंथाचे वाचन जीवनात महत्त्वाचे आहे. मी घरूनच मॉ भगवतीचे नाव घेऊन निघते. मॉ जगदंबेची मी भक्त आहे. सध्या प्रत्येक क्षेत्रात राजकारणाचा शिरकाव झाला आहे. समाजात शिक्षणाचा अभाव असल्याने पुरोगामी विचार तरु शकत नाही. त्यामूळे समाजात शिक्षणाचा प्रसार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
उष्माघाताने रेल्वे कर्मचार्याचा मृत्यू