Friday, March 28, 2025
Homeमनोरंजनप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन

मुंबई । Mumbai

जेष्ठ व प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल यांचे आज पहाटे निधन झाले आहे. वयाच्या 35 व्या वर्षी आदित्याचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अचानक आदित्यचा मृत्यू झाल्याने पौडवाल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

- Advertisement -

मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होता आदित्य

गेल्या काही दिवसांपासून आदित्य मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचार सुरु असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. आदित्य पौडवालच्या पश्चात आई अनुराधा पौडवाल आणि गायिका बहीण कविता पौडवाल असा परिवार आहे.

आदित्यही आई-वडिलांप्रमाणे संगीत क्षेत्रात कार्यरत

दिवंगत संगीतकार अरुण पौडवाल आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचा आदित्य हा मुलगा. आदित्यही आई-वडिलांप्रमाणे संगीत क्षेत्रात कार्यरत होता. म्युझिक अरेंजर, संगीतकार म्हणून आदित्यने संगीत विश्वात स्वतःची ओळख निर्माण केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटातील ‘साहेब तू’ या गाण्याचा प्रोड्युसर म्हणूनही त्याने काम केले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...