Saturday, July 27, 2024
Homeमनोरंजनप्रसिद्ध गायक एस.पी.बालसुब्रमण्यम यांचे निधन

प्रसिद्ध गायक एस.पी.बालसुब्रमण्यम यांचे निधन

दिल्ली | Delhi

प्रसिद्ध पार्श्वगायक एस.पी.बालसुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांचे आज निधन झालं आहे. चेन्नईतील एका खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या महिन्यात बालसुब्रमण्यम यांना करोनाची लागण झाली होती. त्यांनंतर त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

- Advertisement -

एसपीबी यांचा जन्म 4 जून 1946 रोजी तिरुवल्लूर जिल्ह्यातील कोंडडमपट्टू गावात जन्म झाला होता. 1966 साली श्री श्री मरियता रमणा या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा एका गाण्याला आवाज दिला. एस.पी.बालसुब्रमण्यम यांनी 40 हजारहून अधिक गाणी गायली होती. त्यांनी अभिनय, संगीत दिग्दर्शन आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातही उत्तम कामगिरी केली होती. गेल्या चाळीस वर्षांमध्ये केवळ तमिळच नाही तर संपूर्ण भारतातील श्रोत्यांना त्यांच्या मधुर आवाजाने मुग्ध केलं होतं. तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, संस्कृत, हिंदी अशा अनेक भाषांमधून त्यांनी गीतांना आवाज दिला होता.

SBP या नावाने ओळखले जाणारे बालसुब्रमण्यम यांची हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम भाषांतली अनेक गाणी लोकप्रिय आहेत. तामिळबरोबरच हिंदी चित्रपटांमधील त्यांची असंख्य गाणी गाजली. त्यातगी मैने प्यार किया आणि हम आपके है कौन या चित्रपटांमधील त्यांच्या आवाजातली गाणी सर्वत्र ऐकली जाऊ लागली. प्रेक्षकांचं, श्रोत्यांचं त्यांना विशेष प्रेम मिळाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या