Monday, April 28, 2025
Homeमनोरंजनप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल अडकणार लग्नबंधनात

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल अडकणार लग्नबंधनात

मुंबई | Mumbai

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. अभिनेत्री काजल अग्रवाल हिने आज गौतम किचलूसोबत (Gautam Kitchlu) तिच्या लग्नाची घोषणा केली आहे.

- Advertisement -

येत्या 30 ऑक्टोबर रोजी काजल गौतमसोबत मुंबईमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून काजल आणि गौतमच्या लग्नाबद्दलही बातम्या माध्यमात झळकत होत्या. आज अखेर काजलने त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. काजलने ही बातमी आपल्या सोशल मीडियावरून शेअर केली आहे.

काजलने आपल्या इन्स्टाग्रामवर यासंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे की, मी 30 ऑक्टोबर रोजी गौतम किचलू यांच्याशी मुंबईत एका खासगी विवाह सोहळ्यात लग्न करणार आहे.

या लग्न सोहळ्यात कुटुंबातील जवळचे सदस्य उपस्थित असतील. कोरोना महामारीमुळे आमच्या आनंदावर थोड्या फार प्रमाणात विरजन पडलं आहे. परंतु, आम्ही या नवीन प्रवासासाठी उत्सुक आहोत आणि आम्ही आशा करतो की, आपणदेखील यासाठी आम्हाला चीअर कराल. वर्षानुवर्षे तुम्ही मला दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. मला आवडणारं प्रेक्षकांच मनोरंजन करण्याचं काम मी करत राहील. आपल्या सर्वांच्या सपोर्टसाठी धन्यवाद.’

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...