दिल्ली | Delhi
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री लीना आचार्य यांचे शनिवारी २१ नोव्हेंबर रोजी निधन झाले आहे. लीना आचार्य यांची किडनी निकामी झाल्यामुळे, त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला.
लीना आचार्य गेल्या दीड वर्षापासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होती. काही काळापूर्वी त्यांच्या आईने आपली किडनी दान केली होती, परंतु यामुळेही लीना यांचा जीव वाचू शकला नाही. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
लीना आचार्य यांनी ‘सेठ जी’, ‘आप के आ जाने से’, ‘मेरी हानिकारक बीवी’ या मालिकांमध्ये काम केले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी ‘हिचकी’ या चित्रपटात देखील काम केले आहे. त्यांनी वेब सीरिजमध्ये देखील काम केले आहे.
याआधी बातमी आली होती की लीना आचार्य यांचे करोनामुळे निधन झाले आहे मात्र आता मूत्रपिंडाच्या विकारामुळे त्यांचे निधन झाल्याची पुष्टी झाली आहे. दिवंगत अभिनेत्रीसोबत व्यतीत केलेले क्षण आठवत, उपासनाने सांगितले की, २०१५ मध्ये मला लीना यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.
त्यांनी सेठ जी मध्ये माझ्या आईची भूमिका साकारली होती. यामध्ये मी एक महाराष्ट्रीय गणेश रावची भूमिका सकारात होती. मी त्यांना आई ऐवजी माई म्हणायचो. या दरम्यान आमच्या दोघींमध्ये एक खास बंध तयार झाला होता. मुंबईत मी एकटी राहत असल्याने त्या माझ्यासाठी जेवण आणत असत, त्या खूप प्रेमळ व्यक्ती होत्या.’