Saturday, May 18, 2024
Homeनंदुरबारजिल्हाभरात आज 237 गणेश मंडळातर्फे गणरायाला निरोप

जिल्हाभरात आज 237 गणेश मंडळातर्फे गणरायाला निरोप

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यात (.Nandurbar District) यंदा एकूण 860 मंडळाकडून (Ganesh Mandal) गणरायाची स्थापना (Establishment of Ganaraya) करण्यात आली होती. उद्या अनंत चतुर्थीच्या (Anant Chaturthi) शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील 237 गणेश मंडळातर्फे गणरायाला निरोप (Saying goodbye) देण्यात येणार आहे. यात 121 सार्वजनिक गणेश मंडळ 98 खाजगी तर 18 एक गांव एक गणपती मंडळांचा समावेश आहे.

- Advertisement -

शासनाने यंदा गणेशोत्सवासाठी सर्व नियम शिथील करण्यात आल्याने कोरोना नंतर प्रथमच जिल्ह्यात गणेश उत्सव मोठया उत्साहात साजरा होत आहे. यावर्षी जिल्ह्यात 860 मंडळाकडून गणरायाची स्थापना करण्यात आली होती. यात 423 सार्वजनिक, 338 खाजगी व 99 एक गाव एक गणपतींचा समावेश होता. यामध्ये 8 टप्यांमध्ये गणरायाचे विसर्जन करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

यात दिड दिवसाचा गणपतीमध्ये एका मंडळाकडून गणरायाचे विसर्जन करण्यात आले. तिसर्‍या दिवशी चार मंडळाकडून गणरायाला निरोप देण्यात आला तर दि.4 सप्टेंबर रोजी पाचव्या दिवशी 258 मंडळाकडून गणरायाला निरोप देण्यात आला तर दि.5 सप्टेंबर रोजी जिल्हाभरात एकूण 73 गणेश मंडळाकडून गणेश विसर्जन करण्यात आले तर दि.6 सप्टेंबर रोजी सातव्या दिवशी 194 गणेश मंडळातर्फे गणरायाला निरोप देण्यात आला.

आठव्या दिवशी पाच व काल दि.8 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील 89 गणेश मंडळांतर्फे गणेशाचे विसर्जन करण्यात आले. यात सार्वजनिक 45, खाजगी 42 तर दोन एक गांव गणपतीचा समावेश होता. अनंत चतुर्थीच्या दिवशी जिल्ह्याभरात 237 गणेश मंडळातर्फे गणरायाला निरोप देण्यात येणार आहे.

यामध्ये नंदुरबार शहर पोलीस ठाणे अंतर्गत 30 सार्वजनिक, 11 खाजगी, उपनगर पोलीस ठाणे अंतर्गत 5 सार्वजनिक, 2 खाजगी, तालुका पोलीस ठाणेतंर्गत 14 सार्वजनिक, 5 एक गांव एक गणपती, नवापूर पोलीस ठाणेतंर्गत 29 सार्वजनिक एक खाजगी, विसरवाडी पोलीस ठाणेतंर्गत 1 सार्वजनिक, एक एक गांव एक गणपती, शहादा पोलीस ठाणेतंर्गत 18 सार्वजनिक, 75 खाजगी तर 3 एक गांव एकगणपती, म्हसावद पोलीस ठाणेतंर्गत 2 सार्वजनिक, 3 खाजगी, 5 एक गांव एक गणपती, सारंगखेडा पोलीस ठाणेतंर्गत 4 सार्वजनिक, 4 खाजगी, 2 एक गांव एक गणपती, धडगांव पोलीस ठाणेतंर्गत 5 सार्वजनिक, 1 खाजगी, 2 एक गांव एक गणपती, अक्कलकुवा तालुक्यातील 8 सार्वजनिक, एक खाजगी, तळोदा पोलीस ठाणेतंर्गत 2 सार्वजनिक, मोलगी पोलीस ठाणेतंर्गत 3 सार्वजनिक असे 121 सार्वजनिक, 98 खाजगी, 18 एक गांव एक गणपती असे एकूण 237 गणेश मंडळातर्फे गणरायांना निरोप देण्यात येणार आहे.

दरम्यान गणेश विसर्जन मिरवणूकीदरम्यान कुठलीही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस दलातर्फे एक पोलीस अधिक्षक, एक अप्पर पोलीस अधिक्षक, 6 पोलीस उपअधिक्षक, 19 पोलीस उपनिरीक्षक, 61 सहायक पोलीस निरीक्षक तथा उपनिरीक्षक, 729 पोलीस अंमलदार, 194 महिला पोलीस अंमलदार , 5 स्ट्रायकिंग फोर्स, दोन आरसीटी, दोन क्यु.आर.टी., एक एसआरपीएफ कंपनी तर 600 होमगार्ड असा तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या