Thursday, May 23, 2024
Homeनंदुरबारनंदुरबारात कानुमातेला जल्लोषात निरोप

नंदुरबारात कानुमातेला जल्लोषात निरोप

नंदुरबारNandurbar । प्रतिनिधी

खान्देशातील कुलदैवत Kula daivata असलेल्या कानुमातेला Kanumatela आज ढोलताशांच्या dholatas गजरात उत्साहात निरोप Farewell देण्यात आला. डीजे आणि बँडद्वारे वाजवली जाणारी अहिराणी गीते, ढोल-ताशांचा गजर, महिलांकडून खेळल्या जाणार्‍या फुगड्यांसह नृत्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.

- Advertisement -

श्रावण महिन्याच्या पहिल्या आणि दुसर्‍या रविवारी खान्देशातील कुलदैवत असलेल्या कानुमातेची स्थापना केली जाते. सोमवारी सकाळी मातेचे विसर्जन करण्यात आले. काल दि. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्ष आणि कानुमातेचा उत्सव एकाच दिवशी आल्याने दुग्ध शर्करा योग जुळून आला. जिल्ह्यात रविवारी ठिकठिकाणी कानुमातेची स्थापना करण्यात आली होती.

सोमवारी सकाळी या उत्सवाची कानुमाता विसर्जनाने सांगता झाली. नंदुरबारसह ग्रामीण भागातील नागरिक वाहनांद्वारे कानुमातेच्या विसर्जनासाठी प्रकाशा येथे सकाळपासून दाखल होत होते. तापीघाटावरून कानुमातेचे विसर्जन करण्यात आले. तर शहरात उत्साहपूर्ण वातावरणात कानुमातेचे विसर्जन करण्यात आले. शहरात रविवारी घरोघरी कानुमातेची स्थापना करण्यात आली होती, यानिमित्त सायंकाळपासून घरोघरी उत्सवी वातावरण होते. गीत-संगीत यामुळे चैतन्य निर्माण झाले होते.

सोमवारी सकाळी आठ वाजेपासून शहरातील मेन रोड येथून एकत्रित विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली होती. शहरातील पाताळगंगा नदी किनारी कानुमातेची विधीवत पूजा करण्यात आली, महिलांनी जागोजागी कानुमातेचे दर्शन घेत पूजा केली. मिरवणुकीत महिलांचा विशेष सहभाग होता. यंदा नदीला भरपुर पाणी नसल्याने विसर्जन करण्यात अडचण निर्माण झाली. यासाठी टँकरचा वापर करण्यात आला.

नदीकिनारी पुजा करून समारोप करण्यात आला होता. रविवारी सायंकाळपासून दर्शन घेण्यासाठी नागरिक भेटी देत होते. सर्वधर्मीय कानुमाता उत्सवासाठी गेल्या आठ दिवसांपासून तयारी सुरु होती. यातून आर्थिक उलाढालही झाली आहे. नंदुरबार शहरातील माळीवाडा भागात दोन दिवसांपासून उत्सवाचे वातावरण होते.

सोमवारी सकाळी घराघरातून निघालेल्या कानुमाता विसर्जन मिरवणुका पुढे एकत्रितपणे पाताळगंगा नदीकडे मार्गस्थ झाल्या. काही भाविक खाजगी वाहनाने प्रकाशाकडे रवाना झाले. कानुमाता उत्सवाच्या निमित्ताने ढोल-ताशे वादकांनाही रोजगार मिळाला. सकाळपासून ठिकठिकाणी ढोलताशांच्या तालावर लेझिमनृत्य सुरु होते. अत्यंत भावपूर्ण वातावरणात कानुमातेला निरोप देण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या