धुळे Dhule। प्रतिनिधी
कोरोनाचे सावट काहीसे कमी झाल्याने यंदा कानुमातेच्या उत्साहाला Kanumate अधिकचे भरते यईल, असे वाटत होते. मात्र प्रशासनाने डिजेला परवानगी नाकारल्याने अनेक भाविकांच्या आनंदावर विरजन पडले. परंतु परंपारिक वाद्यांच्या beat of traditional instruments तालावर नाचत आणि जयघोष करीत कानूमातेला निरोप Farewell देण्यात आला.
खान्देशचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणार्या कानूमातेचा उत्सव अत्यंत आनंदात साजरा केला जातो. दीड दिवसांच्या या उत्सवानिमित्त रोट, नैवेद्य आणि चालत आलेल्या परंपरेनुसार पूजा करुन व रात्रभर जागर करुन आनंदात कानूमातेला निरोप दिला जातो. निसर्गात, शेती हंगामात होणार्या बदलाच्या प्रसंगी घराघरात बसणार्या कानूमातेसमोर धनधान्य पिकू दे, रोगराई जावू दे, सुख समृध्दी येवू दे असे साकडे घातले जाते. सामाजिक एकता, नात्यांमधील घट्टता आणि गावे एकमेकांना जोडण्याच्या दृष्टीनेही या उत्सवाला खान्देशात अनन्य साधारण महत्व आहे.
यंदा पावसाने पाठ फिरविली असली तरी कानूमातेच्या विसर्जनासाठी मनपाच्या वतीने पांझरा नदीच्या काठावर पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था करण्यात आली होती. निर्माल्यसाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून आले.