Saturday, May 17, 2025
Homeनगरशेतात रोटा मारत असताना ट्रॅक्टर उलटून शेतकर्‍याचा मृत्यू

शेतात रोटा मारत असताना ट्रॅक्टर उलटून शेतकर्‍याचा मृत्यू

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतात रोटाव्हेटर मारत असताना ट्रॅक्टर उलटून शेतकरी ट्रॅक्टरखाली दबून जागेवर ठार झाला. ही घटना राहुरी तालुक्यातील दरडगाव थडी येथे 6 मे रोजी सकाळी घडली. संजय सीताराम जाधव (वय 43) ता. दरडगावथडी यांची मुळा नदीकाठी शेतजमीन आहे. संजय जाधव हे सकाळी 10.30 वाजे दरम्यान त्यांच्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटा मारीत होते. यावेळी ट्रॅक्टरचे चाक बांधावर जाऊन ट्रॅक्टर उलटला आणि संजय जाधव हा शेतकरी ट्रॅक्टर खाली दबला गेला. तेव्हा परिसरातील मच्छिंद्र जाधव, बाबुराव दोंदे, बापूसाहेब रोकडे, संदीप जाधव, मधुकर जाधव यांच्यासह अनेक तरुणांनी तात्काळ मदतकार्य करून जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर उचलला आणि संजय जाधव या शेतकर्‍याला बाहेर काढले.

जाधव यांना तात्काळ राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, वैद्यकीय अधिकारी आंबरे यांनी संजय जाधव यांना तपासून उपचारा पूर्वीच मयत घोषित केले. संजय जाधव यांचे मित्र व नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. दुपारी उशिरापर्यंत संजय जाधव यांचे शवविच्छेदन सुरू होते. संजय जाधव यांच्या अपघाती निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा, बहिण, भाऊ असा परिवार आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

ज्योती

Who Is Jyoti Malhotra: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्युबर ज्योती मल्होत्राला अटक;...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi हरियाणातील ट्रॅव्हल युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हिसारची रहिवासी असलेली ज्योती मल्होत्राला कैथल...