Thursday, January 8, 2026
Homeक्राईमशेतीच्या वादातून वृध्दाला मारहाण

शेतीच्या वादातून वृध्दाला मारहाण

मेहकरी शिवारातील घटना || चौघांविरूध्द पोलिसात गुन्हा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

स्टे असलेल्या जमिनीत जेसीबीच्या सहाय्याने काम करत असताना विरोध केल्याच्या रागातून वृध्द शेतकर्‍याला मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (23 नोव्हेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास मेहकरी (ता. नगर) येथील शेत गट नंबर 371 मध्ये घडली. शिवाजी मारूती पालवे (वय 76 रा. मेहकरी) असे मारहाण झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात रविवारी (24 नोव्हेंबर) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ विष्णु शिरसाठ, अर्जुन हरिभाऊ शिरसाठ, अक्षय हरिभाऊ शिरसाठ, अर्जुन हरिभाऊ शिरसाठ (सर्व रा. मेहकरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

शनिवारी सायंकाळी शिवाजी हे रस्त्याच्या कडेला उभे असताना संशयित आरोपी हे शिवाजी यांच्या शेतीच्या बांधाच्या मधील नाल्यावरील नळी जेसीबीच्या सहाय्याने बाजुला काढत असताना शिवाजी त्यांना म्हणाले,‘या जमिनीला स्टे आहे, या जमिनीची मोजणी झाल्याशिवाय तुम्ही काही करू नका’ असे म्हणाल्याने जेसीबीचा चालक तेथून निघून गेला. त्यानंतर संशयित आरोपी यांनी शिवाजीला दगड फेकून मारून जखमी केले. शिवीगाळ करून त्यांचा मोबाईल फोडून नुकसान केले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धमकी दिली. शिवाजी यांनी दुसर्‍या दिवशी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस अंमलदार महेश भवार करत आहेत.

YouTube video player

ताज्या बातम्या

संपादकीय : ८ जानेवारी २०२६ – शहाणे होण्याची गरज

0
जनतेला आता राजकारण्यांची, नेत्यांची कमाल वाटायला लागली असेल. चेहर्‍यावर सोयीनुसार वेगवेगळे मुखवटे चढवायचे. तोच खरा चेहरा असल्याचे भासवायचे. गरज पडली तर मुखवट्याचे रंगही बदलायचे....