संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील वडगाव लांडगा (Wadgaon Landga) येथील तरुण शेतकर्याचा गुरुवारी (दि.24) पहाटे पाच वाजता शेततळ्या बुडून दुर्दैवी मृत्यू (Farmer Death) झाल्याची घटना घडली आहे.
- Advertisement -
याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की सोपान बाळासाहेब लांडगे (वय 29) हा तरुण शेतकरी पहाटे शेततळ्यावर पाहणी करण्यासाठी गेला असता पाण्यात पडून मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली. त्यास तत्काळ घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकार्यांनी उपचारांपूर्वीच मयत असल्याचे घोषित केले.
याबाबत ज्ञानेश्वर बाळासाहेब लांडगे यांनी दिलेल्या खबरीवरुन तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.