Tuesday, April 1, 2025
Homeक्राईमकळसमध्ये शेतात नांगरणी करणार्‍या शेतकर्‍यावर हल्ला

कळसमध्ये शेतात नांगरणी करणार्‍या शेतकर्‍यावर हल्ला

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यातील कळस येथे शेतामध्ये नांगरणी करीत असणार्‍या शेतकर्‍यावर शेजार्‍यांकडून हल्ला करण्यात आला असून, दगडफेकीत ट्रॅक्टरचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी अकोले पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, कळस येथील दीपक पुंजा वाकचौरे हे त्यांच्या शेतामध्ये बुधवारी (दि. 19 जून) दुपारी दोनच्या दरम्यान नांगरणी करीत होते.

- Advertisement -

यावेळी शेजारील शेतकर्‍यांनी हे वावर नांगरू नको, असे म्हणून त्यांना शिवीगाळ केली तसेच हे वावर नांगरलं तर आम्ही तुझा खून करू, अशी धमकी देऊन ट्रॅक्टरवर दगडफेक केली. यात ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी दीपक वाकचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी रामभाऊ एकनाथ वाकचौरे व बाळासाहेब काशिनाथ वाकचौरे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कुंभमेळा नामकरणाच्या वादानंतर नाशिकमध्ये उफाळणार नवा वाद;...

0
नाशिक | Nashik येथे २०२७ साली सिंहस्थ कुंभमेळा (Kumbh Mela) होणार असून या पार्श्वभूमीवर आतापासूनच प्रशासनाची तयारी सुरु झाली आहे. परंतु, त्याआधीच साधू-संतांमध्ये नामकरण आणि...