Monday, June 24, 2024
Homeनगरशेतकर्‍याचे घरफोडून सोने, रक्कम लांबवली

शेतकर्‍याचे घरफोडून सोने, रक्कम लांबवली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर तालुक्यातील उक्कडगाव शिवारातील शेतकर्‍याचे घर फोडून दीड तोळ्याचे मणीमंगळसूत्र, 15 हजाराची रोख रक्कम एलआयसीच्या पावत्या, पोस्टाच्या डिपॉजिट पावत्या व इतर कागदपत्रे असा 40 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. मंगळवारी (दि. 5) रात्री साडे अकरा ते 12 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

याप्रकरणी बुधवारी (दि. 6) दुपारी नगर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. दादासाहेब गंगाधर शेळके (वय 38) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी शेळके यांचे उक्कडगाव शिवारात घर असून मंगळवारी रात्री साडे अकरा ते 12 वाजेच्या दरम्यान त्यांच्या गेटचे व घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला.

लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले दीड तोळ्याचे सोन्याचे मणीमंगळसूत्र, 15 हजार रूपये रोख रक्कम, एलआयसीच्या पावत्या, शैक्षणिक प्रमाणपत्र, पोस्टाचे डिपॉजिट पावत्या व इतर कागदपत्रे असा 40 हजाराचा ऐवज चोरून नेला आहे. रात्री 12 वाजता हा प्रकार लक्ष्यात आला. शेळके यांनी नगर तालुका पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार वांढेकर करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या