Wednesday, February 4, 2026
HomeनगरAhilyanagar : 5.40 लाख शेतकर्‍यांना 1 हजार 2 कोटींची मदत

Ahilyanagar : 5.40 लाख शेतकर्‍यांना 1 हजार 2 कोटींची मदत

85 हजार शेतकरी वंचित || ई-केवायसी, ऍग्रीस्टॅक नोंदणी करण्याचे आवाहन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पीकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीनंतर शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 1 हजार 506 कोटी 41 लाख रूपये इतक्या अनुदानाची तरतूद केली आहे. जिल्ह्यातील एकूण 8 लाख 27 हजार 118 शेतकर्‍यांचे नुकसान नोंदवण्यात आले असून त्यापैकी 5 लाख 40 हजार 756 शेतकर्‍यांना 1 हजार 2 कोटी 27 लाख रूपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. अद्याप 85 हजार 528 शेतकर्‍यांचे इ-केवायसी प्रलंबित असल्याने त्यांचे अनुदान जमा होऊ शकलेले नाही.

- Advertisement -

अहिल्यानगर तालुक्यात 39 हजार 269 शेतकर्‍यांना 74 कोटी 55 लाख रूपये मिळाले असून 4 हजार 849 शेतकरी इ-केवायसीशिवाय आहेत. अकोलेमध्ये 1 हजार 89 शेतकर्‍यांना 78 लाख रूपये वितरित झाले असून 3 हजार 899 प्रलंबित आहेत. जामखेडमध्ये 32 हजार 886 शेतकर्‍यांना 60 कोटी 22 लाख रूपये मदत मिळाली असून 3 हजार 958 जणांचे इ-केवायसी बाकी आहे. कर्जत तालुक्यात 49 हजार 786 शेतकर्‍यांना 102 कोटी 75 लाख रूपये देण्यात आले असून 9 हजार 407 शेतकरी प्रलंबित आहेत. कोपरगावमध्ये 32 हजार 698 शेतकर्‍यांना 48 कोटी 60 लाख रूपये मिळाले असून 6 हजार 14 शेतकरी इ-केवायसी न करता आहेत.

YouTube video player

नेवासा तालुक्यात 71 हजार 622 शेतकर्‍यांना 146 कोटी 78 लाख रूपये वितरित झाले असून 8 हजार 741 प्रलंबित आहेत. पारनेरमध्ये 37 हजार 564 शेतकर्‍यांना 59 कोटी 63 लाख रूपये मिळाले असून 2 हजार 470 जणांचे इ-केवायसी बाकी आहे. पाथर्डी तालुक्यात 51 हजार 964 शेतकर्‍यांना 101 कोटी 66 लाख रूपये मदत मिळाली असून 11 हजार 519 शेतकरी इ-केवायसीशिवाय आहेत. राहाता तालुक्यात 32 हजार 952 शेतकर्‍यांना 60 कोटी 82 लाख रूपये वितरित झाले असून 5 हजार 97 प्रलंबित आहेत. राहुरीमध्ये 46 हजार 153 शेतकर्‍यांना 81 कोटी 76 लाख रूपये मिळाले असून 4 हजार 410 शेतकरी बाकी आहेत.

संगमनेरमध्ये 18 हजार 979 शेतकर्‍यांना 27 कोटी 18 लाख रूपये मिळाले असून 3 हजार 103 जणांचे इ-केवायसी अपूर्ण आहे. शेवगावमध्ये 50 हजार 460 शेतकर्‍यांना 110 कोटी 86 लाख रूपये वितरित झाले असून 8 हजार 571 शेतकरी अपूर्ण आहेत. श्रीगोंदा तालुक्यात 46 हजार 716 शेतकर्‍यांना 75 कोटी 32 लाख रूपये मिळाले असून 10 हजार 295 प्रलंबित आहेत. श्रीरामपूरमध्ये 28 हजार 618 शेतकर्‍यांना 51 कोटी 36 लाख रूपये मदत मिळाली असून 3 हजार 195 शेतकरी इ-केवायसीशिवाय आहेत. जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍यांनी इ-केवायसी तातडीने पूर्ण करावे तसेच पुढील कालावधीत राज्यामध्ये ई-पंचनामा प्रणाली लागू होणार असल्याने ऍग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Online Gaming : धक्कादायक! ऑनलाईन गेमचा नाद अन् तीन सख्या बहिणींची...

0
गाझियाबाद । Ghaziabad उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनातून तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. साहिबाबाद परिसरातील भारत सिटी...