Saturday, May 4, 2024
Homeधुळेविजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

दोंडाईचा । श. प्र. dhule

जुने कोळदे ता. शिंदखेडा शिवारातील तापी नदीच्या काठावर विद्युत मोटर सुरू करतांना विजेचा धक्का लागून लंघाणे ता. शिंदखेडा येथील शेतकर्‍याचा आज दि.30 रोजी साडेनऊ वाजेदरम्यान जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

जितेंद्र रमेश पाटील (वय 35) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.जितेंद्र पाटील यांची लंघाणे गावाच्या शेत शिवारात त्यांची शेतजमीन आहे. रविवार सकाळी शेतात फवारणी करण्यासाठी पाण्याच्या टाकी भरण्यासाठी लंघाणे तापी नदी काठावर विद्युत मोटार सुरू करण्यासाठी ते गेले होते. अचानक तिथे विजेचा धक्का लागूल जितेंद्र पाटील हे खाली कोसळले. ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच तातडीने त्यांना दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.पारुल अग्रवाल यांनी तपासून मृत घोषित केले. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत जितेंद्र पाटील हे लंघाणे ता. शिंदखेडा येथील महेंद्र रमेश पाटील यांचे भाऊ होते. उपजिल्हा रुग्णालयात आ.जयकुमार रावल यांनी पाटील परिवाराची भेट घेवून सांत्वन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या