Monday, May 27, 2024
Homeनाशिकबैल धुण्यासाठी बंधाऱ्यात गेलेल्या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

बैल धुण्यासाठी बंधाऱ्यात गेलेल्या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

येवला | Yeolaa

आज बैलपोळा (Bailpola) सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र येवल्यातून (Yeola) एक दुखःद घटना समोर येत आहे. कुसूर (Kusur) गावातील एका ३२ वर्षीय शेतकऱ्याचा बैल धुण्याच्या नादात बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला आहे….

- Advertisement -

बैलपोळ्याच्या (Bailpola) दिवशीच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कुसर गावातील शेतकरी आपल्या बैलांना घेऊन गावालगतच्या बंधाऱ्यावर बैल धुण्यासाठी गेला होता.

मात्र बैल धुण्याच्या नादात त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांनी शेतकऱ्याचा मृतदेह बंधाऱ्यातून बाहेर काढला.

- Advertisment -

ताज्या बातम्या