Wednesday, January 15, 2025
Homeनगरशेतकर्‍यांना 15 जानेवारीपर्यंत करता येणार ई- पीक पहाणी

शेतकर्‍यांना 15 जानेवारीपर्यंत करता येणार ई- पीक पहाणी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी ई- पीक पाहणी करून घ्यावी. शेतकरी स्तरावरील ई- पीक पाहणी करण्यासाठी 1 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2025 ही मुदत असून सहायक स्तरावर ई-पीक पाहणी करण्यासाठी 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 ही मुदत आहे. उपजिल्हाधिकारी (महसूल) शारदा जाधव यांनी ही माहिती दिली.
पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, एमएसपी अंतर्गत पिकांची नोंद, ग्रीस्टीक अंतर्गत सर्व योजना तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी ठराविक मुदतीमध्ये ई-पीक पाहणी करून घेणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांना यापूर्वी पीक पाहणीसाठी ई- पीक पाहणी मोबाईल अ‍ॅप उपलब्ध होते.

- Advertisement -

परंतु केंद्र शासनाच्या सुचनेप्रमाणे यामध्ये तांत्रिक बदल करत डिजिटल क्रॉप सर्वे (डीसीएस) मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले असून याच अ‍ॅपच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात ई- पीक पाहणी होणार आहे. दरम्यान, शेतकरी स्तरावरून मोबाईल अ‍ॅपव्दारे पीक पाहणी नोंद करण्यात येऊन शेतकरी स्तरावरील कालावधी संपल्यानंतर सहायकांमार्फत उर्वरित शेतकर्‍यांची पीक पाहणी अ‍ॅपव्दारे नोंदविण्यात येते. शेतकर्‍यांच्या पीक पाहणी मदतीसाठी हंगाम सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून सहायक उपलब्ध आहे.

डिजिटल क्रॉप सर्वे (डीसीएस) मध्ये गटाच्या हद्दीवर आधारित जीओ फेन्सिंग बंधनकारक करण्यात आलेली आहे. जोपर्यंत संबंधित खातेदार, सहायक निवडलेल्या गटात जाऊन पीक पाहणी करत नाही तोपर्यंत पिकांचे छायाचित्र काढता येत नाही व पीक पाहणी अपलोड करता येत नसल्याचेही उपजिल्हाधिकारी जाधव यांनी कळविले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या