Saturday, July 27, 2024
HomeनाशिकVideo : "कांद्याला योग्य भाव मिळू दे, केंद्र अन् राज्य सरकारला..."; नैताळेच्या...

Video : “कांद्याला योग्य भाव मिळू दे, केंद्र अन् राज्य सरकारला…”; नैताळेच्या शेतकऱ्याकडून अमरनाथला कांद्याचा प्रसाद चढवत साकडे

निफाड | प्रतिनिधी | Niphad

जम्मू-काश्मीर राज्यातील प्रसिद्ध देवस्थान व पवित्र गुंफा म्हणून बाबा अमरनाथ व तेथील यात्रा उत्सव देशात व देशाबाहेर प्रसिद्ध आहे. नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी आपल्या स्वतःच्या घरुन पाच किलो कांदे घेऊन अमरनाथ यात्रेचा प्रवास सुरु केला. तब्बल सहा दिवसाच्या रेल्वे, घोड्यावरील, पायी प्रवासानंतर पाच किलो कांदा बाबा अमरनाथ (बाबा बर्फानी) यांना प्रसाद म्हणून अर्पण केला व देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या वतीने प्रार्थना केली. “कांदा पिकाला योग्य भाव मिळू दे, कांदा आयात निर्यातीचे योग्य धोरण ठरविण्यास केंद्र व राज्य सरकारला सुबुध्दी दे” अशी प्रार्थना करुन तो कांद्याचा प्रसाद तेथे उपस्थित असलेल्या व देशसेवेसाठी रात्रदिवस पहारा करणाऱ्या सैनिकांना दिला.

- Advertisement -

अमरनाथ यात्रा जगभरात प्रसिध्द आहे. हा उत्सव जम्मू-काश्मीर राज्यात १ जुलै २०२३ पासून सुरु झाला आहे. भगवान शंकराची पवित्र गुंफा म्हणून मोठा नावलौकिक आहे. टप्याटप्याने अनेक राज्यातील भाविक बाबा अमरनाथच्या दर्शनासाठी प्रवास करत आहे. यात नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे अमरनाथ यात्रेसाठी सोबत पाच किलो कांदे घेऊन बाबा बर्फानीच्या पवित्र गुंफेत समोर असलेल्या दानपेटीला स्पर्श करून पुजाऱ्यांनी परत दिले. तेच कांदे साठे यांनी तेथे यात्रेकरूंच्या संरक्षणासाठी असलेल्या भारतीय लष्करी जवानांसाठी एका जवानाकडे सुपूर्द केले.

UPA नाही तर आता INDIA… विरोधी ऐक्याचे नाव ठरले; काय आहे फुल फॉर्म?

साठे म्हणाले, की वर्षभरापासून कांद्याला भाव नाही, उत्पादन खर्च भेटत नाही. शेतकरी कर्जबाजारी होत आहे. शेतकऱ्यांना चांगले पैसे व्हावे, यासाठी केंद्र व राज्य सरकारने लक्ष द्यावे, सदबुद्धी द्यावी तसेच, अनेक जण देवापुढे पेढ्याचा प्रसाद ठेवतात. हारगुच्छ वाहतात. मी पण माझ्या शेतात रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेले कांदे सर्व भारतीय शेतकऱ्यांच्या वतीने बाबा अमरनाथ गुंफेत ठेवून देशासाठी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सीमेवर पहारा देतात अशा जवानांना ते दिले आहे.

Kirit Somaiya Viral Video : किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओवर निलम गोऱ्हे म्हणाल्या, व्हिडिओ बघणं माझ्यासाठी..

पहेलगाम ते बाबा अमरनाथ गुहेपर्यंत पाऊस व बर्फ थंडी असा खडतर प्रवास करीत साठे यांनी पाच किलो कांदे घेउन गेले होते. सुरक्षारक्षकांनी साठे यांना गुफेत कांदे नेण्यास विरोध केला होता. परंतु, साठे यांनी सांगितले की इतर लोक त्यांच्या श्रद्धेप्रमाणे प्रसाद ठेवतात. त्यानुसार माझी श्रद्धा आहे की मी माझ्या शेतात पिकवलेले कांदे प्रसाद म्हणून आणले आहे. तेव्हा तपासणी करून त्यांनी परवानगी दिली. याप्रसंगी बाजीराव अभंग, दिलीप घायाळ, श्रीकांत मंडलिक, दिलीप निकम, पवन वाकचौरे, संतोष घायाळ, ज्ञानेश्वर देसले, गणेश जेऊघाले आदी शेतकरी उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

देवेंद्र फडणवीसांचे सोमय्यांच्या त्या व्हिडीओवर महत्वाचे विधान ; म्हणाले, हा विषय..

- Advertisment -

ताज्या बातम्या