Thursday, March 13, 2025
Homeनगरशेतकर्‍यांना चार वर्षानंतर मिळणार भरपाई

शेतकर्‍यांना चार वर्षानंतर मिळणार भरपाई

तहसीलदार सांगडे यांची माहिती, शेवगाव तालुक्यातील 13 गावांचा समावेश

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यात सुमारे चार वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सन 2021 च्या पावसाळ्यात नद्यांना पूर आल्याने तालुक्यातील 13 गावांतील बाधित शेतकर्‍यांना अन्न, धान्य व संसारोपयोगी साहित्याची नुकसान भरपाई येत्या दोन दिवसांत वितरीत करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली. 13 गावचे शेतकरी तसेच कृती समितीच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत मंगळवारी तहसील कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत तहसीलदार सांगडे बोलत होते. या नुकसानीची तब्बल चार वर्षांनी सरकारने दखल घेतली आहे. सन 2021 च्या पावसाळ्यात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात शेवगाव तालुक्यार्तील जोहरापूर, वडूले बुद्रुक, डोंगर आखेगाव, आखेगाव तीतरफा, खरडगाव, वरूर बुद्रुक, वरूर खुर्द, भगूर शेवगाव, कांबी हातगाव, गायकवाड जळगाव आदी तब्बल 13 गावांतील नद्यांना पूर आला होता.

- Advertisement -

शेतात पुराचे पाणी घुसल्याने अनेकांच्या शेतजमिनी, घरे, विहिरी, शेळ्या, मेंढ्या, गुरेढोरे व संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांचे संसार उघड्यावर आले. याबाबत महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त पंचनाम्यानुसार विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकार्‍यांकडे नुकसान भरपाई अनुदान वर्ग करण्याचा अहवाल सादर करण्यात आला. यापैकी काही पूरग्रस्त गावातील बाधित शेतकर्‍यांना त्यांच्या शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीची तुटपुंजी नुकसान भरपाई यापूर्वीच अदा करण्यात आली. पशुधन, विहिरी व घरांच्या पडझडीची नुकसान भरपाई चार वर्षानंतरही मिळाली नसल्याने शेतकरी कृती समितीचे दत्तात्रय फुंदे, कॉ.संजय नांगरे, रामकिसन कराड, भाऊ बैरागी यांच्यासह संबंधित गावांच्या शेतकर्‍यांनी तहसीलदार प्रशांत सांगडे व संबंधितांना निवेदन देऊन येत्या दिनांक 25 जानेवारीपर्यंत रखडलेली नुकसान भरपाई मिळावी अन्यथा आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचा निर्धार जाहीर केला.

त्यांच्या या निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार सांगडे यांनी मंगळवारी तहसील कार्यालयात पार पडलेल्या समन्वय बैठकीत तातडीने विविध गावांतील 56 शेतकर्‍यांना नुकसान भरपाईची रक्कम येत्या दोन दिवसांत वितरीत करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच शेतकर्‍यांची गुरेढोरे व मालमत्तेचे नुकसान भरपाईचे पंचनामे दोन दिवसांपूर्वी महसूल विभागाकडे प्राप्त झाल्याने याबाबत विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार पुढील कार्यवाही होईल, असेही सांगडे म्हणाले.

‘सरकारी काम अन् वर्षानुवर्षे थांब’
भरपाईसाठी ताटकळत बसलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या बाबतीत दप्तर दिरंगाईमुळे ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ ऐवजी ‘सरकारी काम अन् वर्षानुवर्षे थांब’ असा अजब प्रकार घडला आहे. असे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने कारभारात सुधारणा करावी, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष फुंदे यांनी म्हटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...