Sunday, September 8, 2024
Homeनगरशेतकर्‍यांचे बंद घर फोडले

शेतकर्‍यांचे बंद घर फोडले

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड शहरालगत असलेल्या चुंबळी येथील गडदे वस्तीवर घरातील माणसं शेतात ज्वारी काढण्यासाठी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील 3 लाख 22 हजार लंपास केल्याची घटना घडली असून भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेने चुंबळी परीसरात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर असे, जामखेड नगर परिषद हद्दीतील चुंबळी येथील गडदे वस्ती येथील रहिवासी व या घटनेतील फिर्यादी रामभाऊ कारंडे (वय 32) हे 2 मार्चला पत्नीसह शेतात ज्वारी काढण्यासाठी गेले होते. तर त्यांची दोन मुले शाळेत गेली होती. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप लावलेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी भरदिवसा कारंडे यांचे घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाट उचकटून त्यातील गाई घेण्यासाठी ठेवलेले 3 लाख 22 हजार रूपये रोख रक्कम चोरुन पोबारा झाले.

सायंकाळी शेतकरी कुटुंब घरी आले तेव्हा घराचे दार उघडे असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी आत जाऊन पाहिले आसता. घरातील कपाटाचे लॉक तुटलेले दिसले व इतर सामान अस्त व्यस्त पडलेले दिसले. फीर्यादीने कपाटात पाहीले असता गाई घेण्यासाठी कपाटात ठेवलेले 3 लाख 22 हजार चोरट्यांनी चोरुन नेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी फिर्यादी कारंडे रा. चुंबळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या