Friday, November 1, 2024
Homeक्राईमशेतकर्‍यांच्या घरी चोरीच्या तीन घटना

शेतकर्‍यांच्या घरी चोरीच्या तीन घटना

कापूस वेचण्यासाठी गेले होते शेतात

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

कापूस वेचण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यांच्या बंद घरी चोरी व चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. अशा तीन घटना वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी भरदिवसा घडल्या आहेत. तालुक्यातील काटेवाडी येथील काकासाहेब ढाकणे यांच्या घरी भर दिवसा चोरट्यांने घरफोडी करून चोरी केली गेली. तर मोहोज देवढे गावात दोन ठिकाणी घरफोडी करून चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे तालुक्यात चोरांचे सत्र पुन्हा एकदा वाढू लागले आहे. ढाकणे हे राहते घराच्या दरवाजाला कुलूप लावून बाहेरगावी तर त्यांच्या कुटुंबियातील व्यक्ती 29 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शेतात कापूस वेचण्यासाठी गेले. ढाकणे हे बाहेर गावावरून पुन्हा दुपारी घरी आले. त्यावेळी घराच्या दरवाजाचा कडी, कोयंडा व कुलूप तुटलेले दिसून आले.

- Advertisement -

घराचा दरवाजा उघडा होता. ढाकणे यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील सामानाची उचकापाचक करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने हे दिवानच्या गादीखाली व पेटीत ठेवलेले चोरट्याने लांबवले. या चोरीच्या घटनेत रोख चाळीस हजार रुपये व पावणे दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबवले. दरम्यान संपतराव गर्जे हे 29 ऑक्टोबरला शेतामध्ये कापूस वेचण्यासाठी गेले. परत दुपारी शेतातून घराकडे आले. त्यावेळी गर्जे यांच्या घराच्या पडवीचे दरवाजे तसेच कंपाऊंडच्या दरवाजाची कुलुपे तुटलेली होती. घरात आत जावून पाहणी केली असता घराचे तिन्ही दरवाजाचे कुलुपे तोडण्याचा प्रयत्न केला गेला.

गर्जे यांच्या घराच्या पाठीमागील त्यांचे भाऊ विनायक गर्जे यांच्याही घराच्या दरवाजाचे चोरट्याने कुलूप तोडून घरातील सामानाची उचकापाचक केली. या तिन्ही घटनेत चोरट्यांविरुद्ध चोरी व चोरी करण्याचा प्रयत्न केला म्हणून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाळीच्या तोंडावर पाथर्डी तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या