अहिल्यानगर (प्रतिनिधी)
विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा कृषी लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) अनिवार्य करण्यात आलेला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभमिळण्यास मदत होईल, तसेच पीक कर्ज, पीक विमा, आणि इतर सुविधा सहज उपलब्ध होतील. याबाबतचा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे.
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक १५ एप्रिल २०२५ पासून अनिवार्य करण्यात येत आहे. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल, सकेतस्थळे, ऑनलाईन प्रणाली इ. मध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही कृषी आयुक्तांनी करावी.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक साठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे.
शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त (कृषि) यांचेद्वारे प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी.
एकाच वेळी सर्व गावातून या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. कृषी संलग्न विभागाच्या योजना सुलभ, पारदर्शक पद्धतीने राबवण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी ही अॅग्रिस्टॅक योजना महत्त्वाची ठरणार आहे.