Thursday, May 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजबिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

बोरगाव । वार्ताहर Borgaon

- Advertisement -

सुरगाणा तालुक्यातील मांधा येथे घराच्या पायाचे खोदकाम करताना अचानक बिबट्याने शेतकर्‍यावर हल्ला चढवत गंभीर जखमी केले. त्यांना तत्काळ सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मांधा येथील रहिवासी सीताराम मलू ठाकरे (44) हे शुक्रवारी सकाळी सहा ते साडेसहा वाजेदरम्यान आपल्या घराच्या पायाचे खोदकाम करत होते. अचानक पाठीमागून बिबट्याने येऊन त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्रथम पांगारणे येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी धाव घेत मोठ्या आवाजाने बिबट्याला जंगलाच्या दिशेने पळवून लावले आणि तातडीने मदतकार्य सुरू केले. नातेवाईकांच्या मदतीने शेतकर्‍याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर घटना समजताच उंबरठाण येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले की, ही घटना अतिशय गंभीर असून ग्रामस्थांच्या मागणीनुसार बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येणार आहे. घटनेनंतर मांधा गावात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. वनविभागाच्या वतीने गावकर्‍यांना सतर्क राहण्याचे आणि अंधारात व एकट्याने शेतात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...