Saturday, May 4, 2024
Homeनाशिकनिफाड : भाव घसरल्याने शेतकर्‍याने मेथीवर फिरवला नांगर

निफाड : भाव घसरल्याने शेतकर्‍याने मेथीवर फिरवला नांगर

निफाड | Niphad

मेथीला बाजारपेठेत मिळणारा भाव बघता शेतातून मेथी काढुन ती बाजारपेठेत नेईपर्यंत खर्चही फिटत नसलयने संतप्त झालेल्या…

- Advertisement -

मरळगोई येथील अरुण थोरे या शेतकर्‍याने आपल्या अर्धा एकर मधील मेथी भाजीवर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटर मारुन संताप व्यक्त केला आहे.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी बाजारपेठेत टोमॅटो, वांगी, कोथंबिर, मेथी, गवार आदी भाजीपाला पिकांना चांगला भाव मिळत होता.

कमी वेळात व कमी श्रमात भाजीपाल्याचे उत्पादन घेता येत असल्याने मरळगोई येथील अरुण थोरे या शेतकर्‍याने 20 गुंठे क्षेत्रावर मेथी भाजीची लागवड केली होती. त्यासाठी खते, निंदणी व रात्रीचा दिवस करुन मेथीला पाणी दिले.

मात्र आता बाजारपेठेत मेथीची जुडी अवघी 5 रु. नगाप्रमाणे विकली जाऊ लागल्याने या भावात मेथी विक्रीला नेणे परवडत नसल्याने मरळगोई खुर्द येथील शेतकर्‍याने मेथी पीकावर रोटर फिरवत संताप व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या