Saturday, May 4, 2024
Homeनाशिकव्यापाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

व्यापाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

अंबासन | Ambasan

नामपुर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्याने व्यापारी कांदा लिलाव प्रक्रियेत उतरलेल्या व्यापा-यामुळे …

- Advertisement -

स्थानिक व्यापाऱ्यांनी आडमुठेपणाचे धोरण अवलंबून प्रक्रियेतून बाहेर पडले. यामुळे शेतकऱ्यांनी व्यापा-याविरोधात संताप व्यक्त करीत तब्बल चार तास ठिय्या आंदोलन केले.

मागील दोन दिवसांपासून पुन्हा बाजार समितीत्या पुर्ववत सुरू झाल्या असतांना स्थानिक व्यापारी आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीनेही आदेश देत लिलावाला सुरूवात झाली.

दोन ते तीन वाहनांचा लिलाव झाल्यानंतर बाजार समितीत नव्याने व्यापारी कांदा खरेदीसाठी श्रीफळ वाढवत असतांनाच अन्य व्यापा-यांनी कांदा लिलाव प्रक्रियेतुन कोणतीही सुचना न देता बाहेर पडले. यामुळे शेतकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

व्यापाऱ्यांच्या या भूमिकेमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठिय्या आंदोलन छेडले. तरी देखील व्यापारी लिलाव प्रक्रियेत सहभागी होत नसल्याने सर्व शेतकरी औरंगाबाद अहवा राज्य महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करीत पुन्हा कांदा उत्पादकांना आवारात बसण्याची विनंती केली.

त्यानंतर सुमारे चार तास शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. मात्र चार तास उलटूनही कोणतीही हालचाल होत नसल्याने दिपक पगार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरत ठिय्या आंदोलन छेडले. व्यापारी धोरणाचा निषेध व्यक्त करीत संताप व्यक्त केला.

दरम्यान जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी तातडीने दखल घेऊन लिलाव प्रक्रिया सुरू करण्यासाठी सभापती संजय भामरे व संचालक मंडळाला व्यापा-यांना विश्वात घेऊन शेतक-यांची होत असलेली पिळवणूक थांबविण्यासाठी विनंती केली.

मात्र सकाळपासून तीन वाजेपर्यंत तोडगा निघाला नसल्याने शेतकरी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू होते. शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला कारणे दाखवा निवेदन दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या