Friday, November 22, 2024
Homeनाशिकदिंडोरी तालुक्यातील शेतकरी, उद्योजक भारनियमनाने त्रस्त

दिंडोरी तालुक्यातील शेतकरी, उद्योजक भारनियमनाने त्रस्त

ओझे | विलास ढाकणे | Oze

दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) महावितरण कंपनीकडून रोज सकाळ, सध्याकाळी भारनियमन होत असल्यामुळे शेतकरी, उद्योजक या भारनियमनाला (Loadsheding) त्रस्त झाले आहेत. मात्र, महावितरणने या भारनियमानावर अजूनपर्यत तोडगा न काढल्यामुळे शेतकरी (Farmer) वर्गामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : नाशिककरांना ४५ कोटींचा गंडा; सायबर फ्रॉडच्या गुन्ह्यांचा उच्चांक

सध्या तर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये संध्याकाळचे इमर्जन्सी भारनियम केले जात आहे. त्यामुळे तालुक्यात वाडया वस्त्यांवर राहणा-या जनतेला अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यात तालुक्यात (Taluka) सर्वच ठिकाणी बिबट्यांची (Leopards) संख्या मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे हे बिबट्ये अंधाराचा फायदा घेऊन वाड्या वस्त्यांवर प्रवेश करताना दिसत आहे. त्यामुळे शेतमंजुरासह शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.

हे देखील वाचा :  नाशकातील चौघांना लाखो रुपयांचा गंडा

तालुक्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे व तालुक्यात भाजीपाला पिकाची लागवड मोठया प्रमाणात असल्यामुळे या पिकांना पाण्याची आवश्यकता असते. मात्र, रोजच्या वाढत्या भारनियमनाने शेतकरी वर्गाला पिकांना पाणी देता येत नाही. त्याप्रमाणे तालुक्यात द्राक्षबागाच्या छाटणी सुरुवात झाली असून पेठ, सुरगाणा तालुक्यातून (Surgana Taluka) छाटणीसाठी आलेल्या मजुरांनाही अंधाराचा सामना करावा लागत असून या मजूरांनाही बिबट्यापासून धोका निर्माण झाला आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : युवकाच्या खूनप्रकरणी सहा जणांना अटक

तसेच तालुक्यात सर्व वाडी वस्त्यांवर लोकांनी बिबट्याच्या भिताने महावितरण कंपनीकडून रीतसर वीज कनेक्शन घेतलेले आहे. मात्र, सतत होणारे रात्रीचे भारनियनामुळे या ग्राहक वर्गामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यात आता दिवसाही इमर्जन्सी भारनियमाच्या नावाखाली विजपुरवठा खंडीत केला जात आहे. त्यामुळे सध्या सर्व स्तरामधून विज पुरवठ्यासंदर्भात तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया ऐकण्यास मिळत आहे. या भारनियमनाने शेतकरी वर्ग त्रस्त असून महाराष्ट्राच्या वीज मंत्र्यासह कृषी मंत्र्यानी या भर नियमानातून त्वरित सुटका करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या