Wednesday, October 16, 2024
Homeनाशिककांदा निर्यात बंदीविरोधात शेतकरी आक्रमक; येवल्यामध्ये रास्ता रोको

कांदा निर्यात बंदीविरोधात शेतकरी आक्रमक; येवल्यामध्ये रास्ता रोको

येवला | प्रतिनिधी

केंद्र सरकारने नुकतीच निर्यात बंदी जाहीर करण्यात आली असून मनमाड नगर महामार्गावर शेतकरी पदाधिकारी यांनी रास्ता रोको केला असून बाजार समिती समोर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. केंद्र सरकारने कांद्यावर अचानकपणे शुक्रवार दिनांक ८ डिसेंबर रोजी निर्यात बंदी लादल्याने कांद्याचे भाव पडले आहे. आधीच अवकाळी व गारपिटीमुळे लाल कांद्याचे नुकसान झाले आहे, त्यातच शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही नसून त्या कांद्यात थोडाफार भाव मिळत असल्याने केंद्र सरकारने शहरी लोकांचा विचार करत तातडीने निर्यात बंदी लादली.

- Advertisement -

मात्र यामुळे चार हजार रुपये विकणारा कांदा अचानक २००० पेक्षाही खाली विकायला सुरुवात झाली त्यात कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आता लिलाव बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप झाल्याचे पहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असल्याने राज्यशासनाने तातडीने पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे.

यावेळी महामार्ग जाम करण्यात आला व केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. याबाबत विधानसभेतही पडसाद उमटले असून शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असून राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तातडीने निर्यात बंदी उठवण्याची मागणी करावी. सध्या शेतकरी संघटना व शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या