श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना महिला आघाडी, अहिल्यानगर यांनी संयुक्तपणे महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करत शासना विरोधी घोषणाबाजी करत अनोखे आंदोलन केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकर्यांना कर्जमाफीचे आश्वासन महायुती सरकारने त्यांच्या संकल्पनाम्यात देऊन पहिल्याच कॅबिनेट बैठकीत निर्णय घेऊ असे म्हटले होते. परंतु त्या आश्वासनांची पूर्ती झालेली नाही, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी महायुतीला त्यांच्या संकल्पनाम्यातील आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी महात्मा गांधी पुतळा येथे महायुतीच्या संकल्पनाम्याची होळी आंदोलन करण्यात आले. तसेच श्रीरामपूर बाजार समिती येथे शहराकडे जाणारा भाजीपाला रोखण्याचे आंदोलन सुरू करण्यात आले. कांद्याचे ट्रक बाजार समितीच्या गेटवरच अडविण्यात आले. सरकारमधील जबाबदार मंत्र्यांनी याबाबतची दखल घेऊन कर्जमाफीसह इतर आश्वासनांची पूर्ती करावी, अशी मागणी त्यावेळी आंदोलकांनी केली.
यावेळी शेतकरी संघटनेचे अनिल औताडे, नेवासा तालुकाध्यक्ष अशोक काळे, अमोल मोढे, सुदामराव औताडे, साहेबराव चोरमल, सागर गिर्हे, समीर रोकडे, इंद्रभान चोरमल, सिकंदर शेख, सतीश नाईक, गोकुळ भालदंड, स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे, उपाध्यक्ष नवनाथ दिघे, शेतकरी संघटना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीताताई वानखेडे, तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, कोमल वानखेडे, शीतल पोकळे, आशा महांकाळे, पुष्पा घोगरे, मंदा गमे, शीला वानखेडे, नारायण वानखेडे, मधू काकड, श्रीराम त्रिवेदी, बाळासाहेब घोगरे, बाबासाहेब गायकवाड, रावसाहेब डांगे, अर्जुन दातीर, संतोष जाधव, रवींद्र वानखेडे, अशोक आव्हाड, नामदेव घोगरे, मयुर भनगडे आदीसह शेतकरी उपस्थित होते.
उद्यापासून शहराकडे जाणारा दूधपुरवठा रोखणार
उद्यापासून शेतकरी संघटना राज्यात ज्या-ज्या ठिकाणी शक्य होईल, त्याठिकाणी शहराकडे जाणारा दूध, भाजीपाला, कांदा आदी रोखणार असल्याच्याही भावना याप्रसंगी आंदोलकांनी व्यक्त केल्या.