धुळे । dhule । प्रतिनिधी
तालुक्यातील धाडरे येथे शेतकर्याने (Farmers) गळफास घेवून आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली आहे. राजेंद्र पोपट पाटील (वय 50 रा. धाडरे) असे त्यांचे नाव आहे. ते काल लहान भावाकडे जावून येतो, असे सांगून गेले होते.
- Advertisement -
Makeup Part 4 # असा करा Self makeup
त्यादरम्यान त्यांनी सामाईक शेताच्या बांधावरील वडाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब समजताच कुटूंबियांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांनी मदतीने राजेंद्र पाटील यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले.
तेथे डॉक्टरांनी तपासणी करीत त्यांना मृत घोषित केले. धुळे तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास पोना बोरसे करीत आहेत.