शिर्डी | Shirdi
साईमंदिरात भाविकांना फुल हार प्रसाद नेण्यास साईसंस्थानने बंदी घातली आहे. फुल-हारांमुळे भाविकांची लुट होते तसेच मंदिरात अस्वच्छता निर्माण होत असल्यानं विश्वस्त मंडळाने फुल-हार बंदीचा ठराव पारित केला आहे.
- Advertisement -
तर या ठरावानंतर याला शिर्डीतून फुल विक्रेते, फुल उत्पादक शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज स्थानिक विक्रेते आणि ग्रामस्थांनी हार फुलांसह साईंच्या दर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न केला. परंतु संबंधितांना सुरक्षा रक्षकांनी राेखलं. त्यामुळे विक्रेते आणि संस्थान सुरक्षा रक्षकांमध्ये वादा – वादी झाली.