Saturday, May 4, 2024
Homeजळगावशेतकरी ५० हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचीत

शेतकरी ५० हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचीत

यावल – प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या नियमित धोरणानुसार सन 2020 /21 मध्ये महात्मा फुले कर्ज माफी योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्ज माफ करून नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याची घोषणा केली होती त्यात वीस ते पंचवीस टक्के शेतकऱ्यांना फक्त हे अनुदान मिळाले मात्र उर्वरित शेतकऱ्यांना अद्याप पावेतो अनुदान मिळाले नसल्यामुळे शेतकरी या लाभांपासून वंचित आहेत

- Advertisement -

या संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे तब्बल तीन वर्षापासून पत्रव्यवहार केला जातो आहे मात्र त्याची आजपर्यंत कुठलीही दखल घेतली गेलेली नाही तीन ते चार वर्षे कालावधी उलटूनही सरकार दोन वेळा बदलले परंतु शेतकऱ्यांच्या या प्रोत्साहन पर अनुदानाकडे शासनाचे दुर्लक्ष दिसत आहे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये फारच कमी शेतकऱ्यांचे अनुदान हे देणे बाकी आहे असे जाहीर केले होते ही त्यांनी सदनामध्ये दिली गेल्या तीन वर्षापासून नियमित पाठपुरावा करूनही अद्याप पर्यंत शासनाकडून कुठलीही दखल घेतली गेलेले नाही

सदर महात्मा फुले कर्ज माफी योजना अंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50 हजार पर्यंतचे प्रोत्साहन पर अनुदान येत्या पंधरा दिवसात अदा करावीत अन्यथा जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने उपोषणाच्या मार्ग अवलंब करावा लागेल असे निवेदन जिल्हाधिकारी जळगाव हे फैजपूर येथे स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्ताने कृषी परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी आले असता मनवेल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे तब्बल चार पंचवार्षिका चेअरमन बिनविरोध म्हणून असलेले कमलाकर हिरामण पाटील यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन सादर केले त्या निवेदनात हे नमूद केले आहे

जिल्हाधिकारी यांचे आश्वासन

यासाठी आपण निश्चितच शासनाकडे पाठपुरावा करू व त्याची गाईडलाईन्स काय आहे व शेतकऱ्यांना ही रक्कम मिळण्यासाठी निश्चित हातभार लावू असे आश्वासन जिल्हाधिकारी जळगाव यांनी दिलेले असून येत्या नऊ ऑक्टोबर 23 सोमवार रोजी कमलाकर पाटील व सहकारी शेतकरी वर्गांना चर्चेसाठी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात बोलावले असल्याचे सांगण्यात आले

- Advertisment -

ताज्या बातम्या