Saturday, April 26, 2025
Homeधुळेशेतमजुरांच्या घराला आग, रोकडसह संसारोपयोगी वस्तु खाक

शेतमजुरांच्या घराला आग, रोकडसह संसारोपयोगी वस्तु खाक

शिंदखेडा।Shindkheda । प्रतिनिधी

येथील जाधव नगरातील शेतमजूराच्या घराला (farmer’s house) शनिवारी रात्री आग (fire) लागली. त्यात 5 हजारांच्या रोकडसह संसारोपयोगी वस्तु जळून खाक (burnt) झाल्या. त्यात सुमारे 40 हजारांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

जाधवनगरातील विहिरीजवळ देवमन गिरधर माळी यांचे घर आहे. ते पक्षघाताच्या आजाराने दोन महिन्यांपासून ग्रस्त असल्याने मुलाकडे राहत आहेत. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. दि. 18 रोजी रात्री 12 वाजेनंतर त्याच्या घरातून आग लागल्याचे परिसरातील तरूणांना दिसून आली. त्यांनी तात्काळ धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले.

तोपर्यंत आगीत घरातील कपडे, धान्य, गाद्या व संसारोपयोगी वस्तु व रोख 5 हजार रूपये जळून खाक झाले. त्यात एकुण 40 ते 45 हजारांचे नुकसान झाले आहे. घराजवळ आगपेटी आणि काड्या पडलेल्या दिसून आल्याने कुणीतरी आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...