Monday, May 20, 2024
Homeमुख्य बातम्या...अन् शेतकऱ्यांनी गावच काढलं विकायला; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

…अन् शेतकऱ्यांनी गावच काढलं विकायला; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

नाशिक | Nashik

शेतमालाला भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ  जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील (Devla Taluka) माळवाडी (Malwadi) गावातील शेतकरी व महिलांनी एकत्र येत ‘ संपूर्ण माळवाडी गाव विकणे आहे ‘ असा ठराव एकमताने केला आहे. हा ठराव केंद्र व राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी अविनाश बागुल यांनी दिली.

- Advertisement -

पाण्याच्या टाकीत पडल्याने दीड वर्षीय बालिका दगावली

यासंदर्भात सोमवारी (दि.६) गावातील शेतकऱ्यांची बैठक होऊन या बैठकीत हा ठराव करण्यात आला. माळवाडी गावात सुमारे ५३४ हेक्टरवर शेतकरी (Farmer) शेती व्यवसाय करत असून त्यात भाजीपाला, ऊस, कडधान्य आणि नगदी म्हणून प्रमुख कांद्याचे पिक घेतले जात आहे. यामधील कोणत्याही शेती उत्पादित मालाला गेल्या ३ ते ४ वर्षापासून फुटी कवडीचाही भाव मिळत नाही. विशेष म्हणजे गावातील ९५ टक्के शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी आहेत. तर माळवाडी आणि फुलेमाळवाडी गांवासह देवळा तालुक्यातील शेतकरी कांदा या प्रमुख पिकावर आपला उदरनिर्वाह व भविष्य बघत आहे.

त्याचबरोबर येथील शेतकऱ्यांना या शेती व्यवसायातून (Agricultural Business)कुटुंबाचे आरोग्य, शिक्षण, लग्न आणि मुख्य म्हणजे दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणार पैसाही उपलब्ध होत नाही. तसेच दैनंदिन गरजा व खाजगी सरकारी बँक कर्ज चुकविण्यासाठी देखील याठिकाणच्या शेतकऱ्यांकडे आज रोजी कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांनी संपूर्ण माळवाडी गाव विकण्याचा ठराव गावात सभा घेऊन पास केला आहे.

महाराष्ट्रात ईडीची मोठी कारवाई; १५ ठिकाणी छापेमारी

तसेच शासनाने शेतकऱ्यांच्या गरजा भागवण्यासाठी व कर्ज मुक्त करण्या इतक्या शेती उत्पादित मालाला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, अन्यथा आम्हाला गाव विकायचे आहे ते सरकारने विकत घ्यावे, अशी मागणी देखील येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, या ठरावासाठी अमोल बागुल, प्रवीण बागुल, राकेश सोनवणे, अविनाश बागुल, अक्षय शेवाळे, यांच्यासह आदींनी सभा आयोजित करून सर्वानुमते ठराव पास करत सर्व शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

कुठल्याही शेती मालाला भाव नाहीत, म्हणून उदरनिर्वाहासाठी आत्महत्या करण्यापेक्षा जमिनी विकून जगता यावे म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांनी गाव विकण्याचा एकमताने ठराव करीत आहोत. यात केंद्र राज्य शासनाने आमच्या जमिनी घेऊन आम्हला पैसे उपलब्ध करून द्यावेत अशी आमची मागणी आहे.

प्रवीण बागुल (सुशिक्षित बेरोजगार शेतकरी, माळवाडी)

- Advertisment -

ताज्या बातम्या