Saturday, May 4, 2024
HomeनाशिकNashik : राज ठाकरेंचा शेतकऱ्यांना सवाल; म्हणाले, अडचणीच्या काळात माझ्याकडे येता, अन्...

Nashik : राज ठाकरेंचा शेतकऱ्यांना सवाल; म्हणाले, अडचणीच्या काळात माझ्याकडे येता, अन् मतदानाच्या वेळी…

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. आज नाशिकमधील काही शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या.

- Advertisement -

यावेळी राज ठाकरे यांनी अडचणीच्या काळात तुम्ही मला भेटायला येता. मतदान पिळवणूक करणाऱ्यांना का करता? असा प्रश्न शेतकऱ्यांना विचारला आहे. तसेच शेतकरी प्रतिनिधींसह आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊ, असेदेखील त्यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे म्हणाले की, मध्यंतरी शेतकऱ्यांनी संप केला होता. तेव्हा काही शेतकरी बांधव मला भेटायला आले होते. मी त्यांना सांगितले, अडचणींच्या काळात माझ्याकडे येता आणि मतदानाच्या वेळी मतदान त्यांना करता. त्यावेळी मला शेतकरी बांधव म्हणाले साहेब अडचण वेगळी आणि मतदान वेगळे.

जे तुम्हाला मदत करत नाही त्यांना तुम्ही मतदान करत आलात तर अडचणींच्या काळात तुम्ही माझ्याकडे का येता? ज्यांनी सांगितले होते की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करतो त्यांना तुम्ही मतदान केले की नाही? आपण काय करतो आहोत त्याचं भान ठेवा, असे त्यांनी म्हटले आहे.

वाढदिवसाच्या दिवशीच हृदयविकाराच्या झटक्याने विद्यार्थ्याचा मृत्यू, आई वडिलांनी…

ते पुढे म्हणाले की, निवडणुकीच्या काळात पैसे घेऊन बाकी सगळ्या गोष्टी घेऊन कुणाला मतदान करता? मग पाच वर्षे त्यांच्या नावाने टाहो फोडता आणि परत निवडणुका आल्यावर त्यांनाच मतदान करता. मग कशासाठी हा खेळ खेळतो आहोत? मी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटतो. मात्र काय करतो आहोत त्याचे भान ठेवा. कारण तुम्ही मतदान त्यांना करता त्यामुळे त्यांना वाटते की हे मतदान आपल्यालाच करणार आहेत. त्यांना काही फरकच पडत नाही असे राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Nashik Crime : कर्जाचे आमिष दाखवून दिला ५ कोटींचा बनावट डीडी, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

यावेळी शेतकरी प्रतिनिधींनी म्हटले की, आज आमच्यासह अनेक शेतकऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंनी आम्हाला हे सांगितले आहे की तुम्ही परत या. तुमच्या जमिनींचे जे प्रश्न आहेत त्याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी तुमचे बोलणे करुन देतो. तुम्हाला न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे आम्ही आज समाधानी आहोत. आज राज ठाकरेंनी आमच्या जमिनीबाबतच्या समस्या जाणून घेतल्या. आमच्या जमिनींचे बँकेकडून लिलाव केले जात आहेत. त्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगितल्या आहेत. राज ठाकरेंनी आम्हाला मदतीचे आश्वासन दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या