Saturday, July 27, 2024
HomeनाशिकNashik News : सिन्नरच्या शेतकऱ्यांचा निळवंडेच्या पाण्यासाठी समृद्धीवर रास्ता रोको

Nashik News : सिन्नरच्या शेतकऱ्यांचा निळवंडेच्या पाण्यासाठी समृद्धीवर रास्ता रोको

नाशिक | Nashik

सिन्नर तालुक्याच्या (Sinnar Taluka) पूर्व भागातील शेतकऱ्यांनी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील (Mumbai-Nagpur Samruddhi Highway) सायाळे शिवारात अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातील (Nilwande Dam) पाणी सिन्नर तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांना मिळावे या मागणीसाठी आंदोलन केले. या आंदोलनात दीडशेहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी एकत्र येत समृद्धी महामार्गावरची वाहतूक रोखून धरल्यामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती…

- Advertisement -

देशदूत संवाद कट्टा : नाशिकमध्ये रुजतंय भरतनाट्यम

अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) देवकवठे, सिन्नर तालुक्यातील मलढोन, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द पाथरे बुद्रुक व वारेगाव येथील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. जलसंपदा विभागाने सिन्नर तालुक्यातील गावांसाठी नदी मार्गाने पाणी सोडले होते. मात्र हे आवर्तन पाथरे वारेगावपर्यंत देण्याची शेतकऱ्यांची (Farmers) आग्रही मागणी आहे. दुसरीकडे सिन्नर तालुका यावर्षी दुष्काळाचा सामना करत आहे. त्यामुळे निळवंडेच्या पाण्यामुळे तरी किमान पूर्व भागातील जनावरांचा व काही अंशी शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल. यामुळे शेतकरी आवर्तनासाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Chhagan Bhujbal : “तर लाठीचार्जनंतर…”; छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल

दरम्यान, नाशिक ग्रामीण पोलीस (Nashik Rural Police) दलाकडून वावी पोलिसांच्या मदतीला सिन्नर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कुमक पाठवण्यात आली होती. तसेच दंगा नियंत्रण पथकाची विशेष प्लाटून देखील आंदोलनस्थळी दाखल झाली होती. याशिवाय या आंदोलनाची नाशिकचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना माहिती देण्यात आली. तर निळवंडे प्रकल्पाचे व जलसंपदा विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाल्यावर शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर समृद्धी महामार्ग सोडला. यावेळी वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे यांनी जलसंपदा विभागाच्या (Water Resources Department) अधिकाऱ्यांना व शेतकऱ्यांना समन्वयातून मार्ग काढावा, महामार्गावरची वाहतूक रोखून धरू नये असे आवाहन केले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या