Friday, November 15, 2024
Homeनगरशेतकर्‍यांनी कांदा लिलाव पाडले बंद!

शेतकर्‍यांनी कांदा लिलाव पाडले बंद!

श्रीरामपुरात फेरलिलावनंतरही काही शेतकर्‍यांनी कांदा नेला मागे

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- काल श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव 80 रुपयांपर्यंतच निघाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी लिलाव बंद पाडले. सुमारे अर्धा तास लिलाव बंद राहिल्यानंतर पुन्हा फेरलिलाव घेण्यात आले.
सध्या अतिशय थोड्या प्रमाणात शेतकर्‍यांकडे कांदा शिल्लक असल्याने बाजार समितीत कांद्याची आवक घटली आहे. काल नेहमीप्रमाणे लिलावास सुरुवात झाली.

- Advertisement -

मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा भाव मोठ्या प्रमाणात कमी काढल्याने शेतकर्‍यांनी लिलाव बंद पाडले. यावेळी व्यापार्‍यांनी लिलाव प्रक्रिया होऊ द्या, त्यानंतर ज्या शेतकर्‍यांना लिलाव मान्य नसेल त्यांनी कांदा मागे न्यावा, असे सांगण्यात आले. यानंतर काही शेतकर्‍यांना लिलाव मान्य न झाल्याने कांदा मागे नेल्याचेही दिसून आले. यावेळी अभय चव्हाण, दिलीप उंडे, उत्तमराव लासुरे, दिलीप चौधरी, राजेंद्र चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत काल झालेल्या लिलावासाठी 300 कांदा गोण्यांची आवक होऊन 1 नंबर कांदा 7000 ते 9000, 2 नंबर कांदा 5500 ते 8000, 3 नंबर कांदा 1500 ते 3000 हजार रुपये याप्रमाणे बाजारभाव मिळाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या