अंबासन | वार्ताहर Ambasan
नामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर आज कांद्याच्या भावातील मोठ्या घसरणीमुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकर्यांनी रयत क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन छेडले. तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक कोलमडून पडली होती.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दिपक पगार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो शेतकर्यांनी सहभाग घेतला. आंदोलक शेतकर्यांनी आपली व्यथा मांडत कांद्याच्या बाजारभावात सातत्याने होत असलेली घट, उत्पादन खर्च व नाफेडसारख्या संस्थांच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला.
जुलै महिन्यात शेतकर्यांनी कांदा भाकर खाऊन आंदोलन केले होते. मात्र त्यानंतरही सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही, “कांदा उत्पादनाचा खर्च प्रतिकिलो १५-१७ रुपये असताना बाजारभाव फक्त ७ ते १० रुपये मिळत आहे. त्यात आता नाफेड व एन.सी.सी.एफ.चा कांदा बाजारात आल्यास भाव आणखी कोसळतील. अशा परिस्थितीत जगायचे तरी कसे?” असा प्रश्न यावेळी आंदोलन करणार्या संतप्त कांदा उत्पादकांनी उपस्थित केला.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष पगार यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली २००६ पासून आम्ही लढा देत आहोत. सत्ता मिळाल्यावर नेते शेतकर्यांना विसरतात. २०१७-१८ मध्ये महाराष्ट्रातून चीन, श्रीलंका, बांगलादेशला कांदा बियाण्यांचा निर्यात झाली, त्यामुळे तेथील कांद्याची चव नाशिकच्या कांद्याशी मिळती-जुळती झाली. यामुळे आपली बाजारपेठ मार खाऊ लागली.” एन सि एफ व नाफेड चा कांदाशासनाने देशांतर्गत विकण्याचा प्रयत्न केल्यास कांद्या भरलेले ट्रक पेटविले जातील व जळीत झालेल्या ट्रकांची जबाबदारी ही शासनाची असेल ही सुद्धा शासनाने नोंद घ्यावी असा इशारा यावेळी बोलताना दिला.
शासनाने निर्यात धोरणामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल केल्याने त्याचा फटका नेपाळ श्रीलंका बांगलादेश म्यानमार आदी देशातील बाजारपेठेवर झालेला असल्याचे कांदा व्यापारी सचिन मुथा यांनी सांगितले निर्यात धोरणाला जर मजबुती दिली कायमस्वरूपी आपला कांदा निर्यात होईल कांद्या निर्यात करीत असताना गेल्या काही वर्षापासून आपल्या येथून कांद्याची बियाणे निर्यात केले जाते कांदा निर्यात करण्यापेक्षा बियाणनिर्यात केले जात कांद्याची निर्यात बंद करतात व बियाण्याची निर्यात चालू करतात याच्यामुळे आपल्या नाशिक जिल्ह्यातील कांद्याची मागणी आपोआप कमी होते कमी होते अशी टीका यावेळी उपस्थित शेतकर्यांतर्फे केली गेलीङ्गङ्गआंदोलनात प्रविण अहिरे, खेमराज कोर, विनोद पाटील, प्रविण सावंत, मयूर नेरकर, राजेंद्र सावंत, विठ्ठल महाजन, अंताजी कोर, बाळासाहेब चौधरी, विशाल पवार आदींसह मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.
नायब तहसीलदार सचिन मारके यांना निवेदन सादर करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता,




