Thursday, November 12, 2026
Homeनाशिककादवाच्या भरभराटीसाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी – खासदार भास्कर भगरे

कादवाच्या भरभराटीसाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी – खासदार भास्कर भगरे

सुवर्ण महोत्सवी गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात

- Advertisement -

ओझे l विलास ढाकणे
नाशिक जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या एकमेव कादवा सहकारी साखर कारखान्याच्या भरभराटीसाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी. ऊस उत्पादकांची वेळेत तोडणी व्हावी यासाठी कारखान्याने विस्तारीकरण हाती घेतले असून, कादवा कारखाना कार्यक्षेत्राबरोबरच निफाड, पेठ, नाशिक आणि इगतपुरी तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही आधार देत आहे, असे प्रतिपादन खासदार भास्कर भगरे यांनी केले.

कादवा सहकारी साखर कारखान्याच्या सुवर्ण महोत्सवी गळीत हंगामाचा शुभारंभ खासदार भास्कर भगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार )जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटिल, कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, उपाध्यक्ष शिवाजी बस्ते , सर्व संचालक मंडळ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ऊसाची मोळी गव्हाणीत टाकूण करण्यात आला . यावेळी खासदार भास्कर भगरे पुढे बोलताना दुष्काळी स्थितीत धरणांचे पाण्याचे योग्य नियोजन करत शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेण्यासाठी मंत्री नरहरी झिरवाळ व आपन. सदैव तत्पर राहू असे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटील म्हणाले की, कादवा कारखान्याच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीत सर्व आजी माजी चेअरमन संचालक यांचे योगदान महत्त्वाचे आहे. साखर उद्योग अडचणीतून मार्गक्रमण करत असताना श्रीराम शेटे आणि त्यांच्या संचालक मंडळाने कारखान्याची गाळप क्षमता १२५० मेट्रिक टनांवरून ३५०० मेट्रिक टनांपर्यंत वाढविली. तसेच इथेनॉल प्रकल्प उभारला. हे काम कौतुकास्पद असून, सभासदांनी संचालक मंडळाच्या पाठीशी उभे राहून जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना श्रीराम शेटे म्हणाले की, कादवा कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादकांचे हित जोपासले असून, जिल्ह्यात चांगला भाव देण्याची परंपरा यंदाही कायम राखली जाईल. शासनाच्या सूचनेनुसार यंदा कारखाना लवकर सुरू करण्यात येत आहे. विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच नवीन प्रकल्प सुरू होऊन पूर्ण क्षमतेने गाळप करता येईल. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले.माजी संचालक संजय पडोळ, माजी सभापती सदाशिव शेळके, बाजार समितीचे संचालक गंगाधर निखाडे आणि युनियनचे अध्यक्ष भगवान जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, अशोक वाघ, अनिल देशमुख, विलास कड, बाळासाहेब देशमुख, दत्तात्रेय जाधव , अरुण देशमुख, भारत खांदवे कारखान्याचे सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक हेमंत माने आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले, तर संचालक सुकदेव जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि अधिकारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गळीत हंगामाच्या प्रारंभानिमित्त त्र्यंबक ढगे, जालंदर गायकवाड, नानासाहेब देशमुख, प्रवीण देशमुख आणि भाऊसाहेब निरगुडे यांच्या हस्ते सपत्नीक गव्हाण पूजन करण्यात आले.

ताज्या बातम्या

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने उडवली...

0
मुंबई | Mumbai एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. गुलाबराव पाटलांच्या सूचक...