Saturday, July 27, 2024
Homeनाशिककृषीनिविष्ठा विक्रेत्यांचा बंद; शेतकर्‍यांची अडचण

कृषीनिविष्ठा विक्रेत्यांचा बंद; शेतकर्‍यांची अडचण

वणी | प्रतिनिधी

रासायनीक खते बि – बियाणे कीटकनाशके विक्रेत्यांवर शासनाने लादलेल्या जाचक अटी व नियमांच फेरविचार करून रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी वणी येथील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी तीन दिवसाचा बंद पुकारला असल्याची माहिती असोसिएशननी दिली.

- Advertisement -

महाराष्ट्र शासनाकडील प्रस्तावित विधेयका मधील जाचक अटी व नियमा विरुध्द तसेच प्रस्तावित पाचही कायदे रद्द करावे. या मागण्यांसाठी तीन दिवस कालावधीत पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदमध्ये वणी येथील सर्व कृषी निविष्ठा विक्रेते सहभागी होणार असून विक्री केंद्रे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वणी येथील बियाणे, खते व किटकनाशके असोसिएशन तर्फे देण्यात आली.

कृषी निविष्ठा विक्री करणार्‍या विरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी सध्या प्रचलित असलेले कायदे पुरेसे आहे. मात्र, राज्य शासनाकडून पुन्हा नवीन कायदे तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रस्तावित कायद्यातील तरतुदी विक्रेत्यासाठी अत्यंत जाचक आहेत. त्यामुळे कृषी निविष्ठा विक्रीचा व्यवसाय करणे अशक्यप्राय होणार आहे. राज्यातील विक्रेते हे कोणत्याही कृषी निविष्ठांचे उत्पादन करीत नाहीत.

कृषी विभागाकडून मान्यताप्राप्त उत्पादक कंपन्यांच्या कृषी निविष्ठा ह्या सीलबंद पॅकिंगमध्ये खरेदी करून शेतकर्‍यांना सीलबंद पॅकिंगमध्ये विक्री करतात. कृषी विभागाकडून मान्यताप्राप्त सीलबंद व पॅकमधील निविष्ठांच्या दर्जाबाबत कृषी विक्रेत्यांना दोषी समजण्यात येऊ नये. योग्य निविष्ठा विकणार्‍या कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर जरब बसविण्यासाठी अन्यायकारक कायदे विक्रेत्यावर लादू नयेत अशी राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांची मागणी आहे.

त्या मागणीला वणी येथील सर्व बियाणे, खते व किटकनाशके विक्रेत्यांचा पाठिंबा देत असल्याची माहिती महेंद्र बोरा, संजय भालेराव, राकेश थोरात, महेंद्र मोरे, कैलास जाधव, संदीप पाटील, आदेश खाबिया, राजेंद्र दुसाणे आदींनी दिली.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या