Tuesday, December 10, 2024
Homeनाशिकशेतकर्‍यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा

शेतकर्‍यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा

पाळे खुर्द । वार्ताहर kalwan/Pale

सद्य स्थितीत कळवण तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी न लावल्याने शेतकरी वर्गांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेतकर्‍यांना आता जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

- Advertisement -

कळवण, पाळे, असोली, हिंगवे हिंगळवाडी, भेंडी, निवाणे आदी परिसरात शेतकर्‍यांनी खरिपातील मका, बाजरी, सोयाबीन, उडीद, मुंग, भुईमुग पिकांबरोबर भाजीपाला टोमॅटो, हिरवी, मिरची, कोथंबिर, कोबी, फ्लॉवर, भेंडी, वालपापडी, भोपळा, वांगी, गवार, गिलके आदी पिकांची लागवड केली आहे. परंतु जून ते ऑगस्ट महिन्यात दमदार प्रतीचां पाऊस न झाल्याने व सध्या हलका मध्यम व रिपरिप पाऊस पडत असल्याने त्याचा विपरीत परिणाम पिकांवर झालेला दिसून येत आहे. हलक्या पावसामुळे शेतातील पिकेही करपा, मावा, अळी या रोगांचा प्रादुर्भाव होतांना दिसत आहे.

शेतकर्‍यांना एक दिवसाआड कीटक नाशक फवारणी करावी लागत आहे. जून, जुलै महिन्यात पडलेला पाऊस हा जमिनीत मुरला जाऊन जमिनीतील पाण्याची पातळीमध्ये समतोल राखला जाऊन ते पाणी विहिरींना पाझरते पण आता तसे होणार नसल्याने पुढील रब्बी हंगाम सुध्दा धोक्यात जाण्याची चिन्हे दिसत असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगितले जात आहे.

ऑगस्ट महिन्यात रिमझिम म्हणजेच श्रावण पाळे असतात तर सप्टेंबरमधील पाऊस पडल्यावर वाहवून जात असल्यामुळे विहिरींना सुध्दा पाणी मुबलक असेल अशी शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तविली जात आहे. एकंदर पाळे खुर्द परिसरात कमी पाऊस झाल्याने शेती व्यवसाय व शेतकरी जीवनावर याचा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. सद्या तरी शेतकरी एक दमदार प्रती च्या पावसाच्या प्रतीक्षेत असून दमदार पावसामुळे पिका वरील रोगराई नष्ट होऊन चांगले पीक येईल ही अपेक्षा शेतकरी वर्ग बाळगून आहेत. पण ती अपेक्षा सुध्दा धूसरच राहणार की काय? असा प्रश्न पडला आहे.

पावसाचा हंगाम फक्त दीड महिना शिल्लक असून या कालावधीत जर पिकांची व्यवस्थित वाढ व रोगराई हटली तर शेतकरी जीवनमान उंचावेल नाही तर मनाशी बाळगलेली अपेक्षा ही स्वप्न बळीराजाचे राहू नये, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या