Tuesday, May 21, 2024
Homeजळगाव35 कोटीच्या भ्रष्टाचाराविरोधात आमरण उपोषण

35 कोटीच्या भ्रष्टाचाराविरोधात आमरण उपोषण

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

पाटबंधारे विभागात अधिकार्‍यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून कोट्यवधी रुपये काम न करता फक्त बिले काढून लाटले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नितीन रंधे यांनी केला असून या विरोधात आज पासून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. तब्बल 35 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील हतनूर धरण, वाघूर धरण यासह इतर धरणांची देखभाल दुरूस्तीची काम करण्याच्या नावाखाली ठेकेदार काम न करता बिले काढून शासनाचा अपहार केला जात आहे. याची चौकशी करण्यात यावी व संबंधित ठेकेदार आणि जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. दोन वर्षापासून मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. या विभागात काम न करता मोठ्या प्रमाणात शासनाचा पैसा लाटून भ्रष्टाचार सुरू असून मी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे जीपीएस चे फोटो काढून आलेलो आहे तरीदेखील या अधिकार्‍यांना काहीही फरक पडलेला नसल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते नितीन रंधे यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या