भीषण अपघात; मनमाड-मालेगाव महामार्गावर प्रवाशांनी भरलेली बस पलटी

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | Nashik

गेल्या काही दिवसांपूर्वी चांदवड जवळ एस. टी. बस (S. T. bus) ला झालेल्या अपघाताची घटना ताजी असताना आज पुन्हा एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

मनमाड-मालेगाव राज्य महामार्गावर (Manmad-Malegaon State Highway) एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. भरधाव एसटी बस पलटी झाली आहे. मालेगावपासून काही अंतरावरील राजस्थान ढाब्याजवळ हा अपघात झाला आहे. अपघातात काहीजण जखमी झाले, सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येते.

पुण्याहून शिंदखेडा येथे ही बस जात होती. बसचे लायनर चिकटल्यामुळे ब्रेक न लागल्याने बस पलटी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. बसमध्ये एकूण 41 प्रवासी प्रवास करत होते.

Accident : विचित्र अपघात, अनेक वाहने एकमेकांवर आदळली; पुणे-मुंबई महामार्गावरील घटना

जखमींना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात (Government hospitals) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी हलविण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *