Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरात गॅस टँकरचा भीषण अपघात

छत्रपती संभाजीनगरात गॅस टँकरचा भीषण अपघात

छत्रपती संभाजीनगर |

जालना रोडवरील वसंतराव नाईक चौक उड्डाण पुलाजवळ एन-4 सिडको या ठिकाणी एच.पी.कंपनीच्या गॅस टँकरचा अपघात झाला आहे. गॅस गळतीमुळे जालना रोड बंद करण्यात आला असून शहरभर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत…

- Advertisement -

या गॅस टँकर मधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झालेली असून सदर गॅस हवेमध्ये पसरलेला आहे. या अपघातस्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात रहिवासी वस्ती,शाळा, कॉलेज, हॉटेल, दुकाने असल्याने मोठ्या प्रमाणात लोक राहतात. त्यामुळे सदर घटनेचे गांर्भीय लक्षात घेता सिडको एन-3,एन-4,एन-5 परिसरातील सर्व शाळा व आस्थपना बंद ठेवण्याचे आदेश निवासी उपजिल्हादंडाधिकारी जर्नाधन विधाते यांनी निर्गमित केले आहे.

दरम्यान, सदरील आदेश आज (दि. ०१ फेब्रुवारी २०२४) रोजी सकाळपासून ते गॅस गळतीची घटना पूर्णत: नियंत्रणात येईल त्या कालावधीपर्यंत अंमलात राहिल. तसेच नागरिकांनी सुरक्षेचा दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या