Tuesday, September 24, 2024
Homeमुख्य बातम्याएसटी बस-कंटेनरचा भीषण अपघात

एसटी बस-कंटेनरचा भीषण अपघात

नांदेड | Nanded

- Advertisement -

जिल्ह्यातील मुखेड – लातूर महामार्गावर (Mukhed – Latur Highway) महामंडळच्या एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात (Accident) झाला असून ९ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यात दोघे गंभीर आहेत…

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुखेड आगाराची बस (Bus) मुखेडकडे येत होती. तर लातूरच्या दिशेने ट्रक कंटेनर जात असताना मुखेडहून चार किलोमीटरच्या अंतरावरील लातूर राज्य महामार्गावरील शिरूर दबडे पाटीच्या वळणावर या दोन वाहनांचा भीषण अपघात झाला.

तसेच या अपघातात बसची समोरची बाजू चक्काचूर झाली असून अपघातातील जखमींना (injured) सुरुवातीला मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात तर नंतर पुढील उपचारांसाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Hospital) हलविण्यात आले आहे. तसेच सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या