Sunday, August 16, 2026
Homeक्राईमCrime News : पित्याला हातोड्याने व लोखंडी गजाने मारहाण

Crime News : पित्याला हातोड्याने व लोखंडी गजाने मारहाण

डोळ्यात टाकली मिरची पावडर!

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बोल्हेगाव परिसरात जमीन नावावर करून देण्याच्या कारणावरून पोटच्या मुलांनी आणि एका नातेवाईकाने वृद्ध पित्याला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपीचंद जाधव (वय 50, रा. बोल्हेगाव) यांनी या संदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रल्हाद जाधव, शरद जाधव आणि जिजाबाइजाधव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोल्हेगाव येथील उभ्या मारुतीच्या पाठीमागे फिर्यादी गोपीचंद जाधव यांच्या राहत्या घरासमोर हा प्रकार घडला.

- Advertisement -

आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे गावातील जमीन त्यांच्या नावावर करून देण्यासाठी तगादा लावला होता. याच कारणावरून वाद होऊन आरोपींनी फिर्यादी यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर त्यांना हातोडा आणि लोखंडी गजाने जबर मारहाण केली. जर तू गावातील जमीन आमच्या दोघांच्या नावावर करून दिली नाही, तर तुला आज जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत आरोपींनी त्यांना बेदम मारहाण व शिवीगाळ केली. या हल्ल्यात गोपीचंद जाधव हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांनी रुग्णालयातून दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या