- Advertisement -
नाशिक। प्रतिनिधी Nashik
कौटुंबिक वादातून नाशिक शहर पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:च्या सहा वर्षीय मुलीचा कापडाने गळा आवळून खून करत स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नाशिकरोड भागातील जेलरोड परिसरात घडली.
स्वप्निल गायकवाड (वय ३४, रा. योगमळा, मॉडेल कॉलनी) असे मृत पोलीस अंमलदाराचे नाव असून, भैरवी (वय ६) असे चिमुकलीचे नाव आहे. मंगळवारी (दि. २४) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
स्वप्निलने नैराश्यातून चिमुकलीचा खून करुन स्वत: आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस पुढील तपास करीत आहेत.




