Monday, April 28, 2025
Homeमहाराष्ट्रमुलगी IAS झाल्याच्या आनंदोत्सवात वडिलांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

मुलगी IAS झाल्याच्या आनंदोत्सवात वडिलांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

यवतमाळ | Yavatmal
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वागद ईजारा येथे आनंदाचा क्षण दुसऱ्या मिनिटाला दु:खात बदलला.मुलगी आयएएस अधिकारी झाल्याचा आनंद साजरा करताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. प्रल्हाद खंदारे असे मृत्यू झालेल्या बापाचे नाव आहे. खंदारे हे पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते.

प्रल्हाद खंदारे यांची मुलगी मोहिनी हिची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकरी म्हणून निवड झाली. मुलगी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी झाल्याचा आनंदोत्सव खंदारे परिवाराकडून साजरा केला जात असताना प्रल्हाद खंदारे यांना ह्रदयविकाराचा झटका आला. कार्यक्रमादरम्यानच प्रल्हाद खंदारे यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. नातेवाईकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी महागाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे खंदारे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

- Advertisement -

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात एका मुलीने आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी कुटुंबीयांनी मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, आनंदात असतानाच तिच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे मुलीच्या यशाचा आनंद आणि कुटुंबातील सदस्यांचा उत्साह दु:खात बदलला. प्रल्हाद खंदारे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आयएएस झालेली मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Neha Singh Rathore : पहलगाम हल्ल्यासंदर्भात ‘चिथावणीखोर’ पोस्ट; गायिका नेहा सिंग...

0
दिल्ली । Delhi प्रसिद्ध गायिका नेहा सिंग राठोड हिच्याविरुद्ध लखनऊच्या हजरतगंज पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत...