Monday, May 12, 2025
Homeक्राईमShrirampur : फत्त्याबाद अ‍ॅसिड हल्ल्याचा तपास लागेना; पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह?

Shrirampur : फत्त्याबाद अ‍ॅसिड हल्ल्याचा तपास लागेना; पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह?

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गेल्या महिनाभरापूर्वी तालुक्यातील फत्त्याबाद येथे झालेल्या अ‍ॅसिड हल्ला प्रकरणाचा अद्यापही पोलीस प्रशासनास तपास लागलेला नाही. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. फत्त्याबादचे माजी सरपंच बाबासाहेब बाळाजी आठरे यांच्या घरी रविवार दि.20 एप्रिल रोजी पहाटे धाडसी दरोड्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी घरात दरोडेखोरांना पाहताच त्यांची सून हर्षदा यांनी आरडाओरडा केल्यामुळे दरोडेखोर दागिने असलेले गाठोडे खाली फेकून गच्चीवरून उड्या मारून पळून गेले होते. ही घटना ताजी असताना दुसर्‍या दिवशीच माजी सरपंच श्री. आठरे यांच्या सूनबाई हर्षदा या पुतणीसोबत आपल्या मुलीला दवाखान्यातून घरी घेऊन येत होत्या.

- Advertisement -

यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या अंगावर अ‍ॅसिड फेकले. या गंभीर घटनेत त्या दोघी जखमी झाल्या. त्यांना लोणी येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बरेच दिवस उलटूनही अद्याप पोलीस प्रशासनास कोणताही सुगावा लागलेला नाही. यामुळे पोलिसाच्या कार्यशैलीवर परिसरातून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. घटनेला जवळपास महिनाभराचा कालावधी लोटला. तरीही गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यातील गुन्हेगारही अजून पोलिसांच्या टप्प्यात आले नाही.गावात घडलेली धाडसी चोरीची घटना, अ‍ॅसिड हल्ल्याच्या घटनेमुळे आरोपीचे मनोबल वाढू शकते.

पोलीस प्रशासनाने या प्रकरणातील दोषींचा शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. सदर घटनेचा तपास लागलेला नसल्याने श्री. आठरे यांच्या सुनेला घराबाहेर जाता येत नाही. त्या अजूनही दहशतीखालीच आहेत. या तपास यंत्रणेवर अप्रत्यक्षरित्या माजी सरपंच बाबासाहेब आठरे यांनी शंका उपस्थित केली आहे. ही घटना घडल्यापासून शोध पथके गावात पंधरा दिवस चकरा मारत होते. मात्र, त्यांना कोणताही सुगावा लागलेला नाही. त्यामुळे घटनांच्या तपासाकडे वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज असल्याचे आठरे कुटुंबियांचे म्हणणे आहे.

…अन्यथा लोणी पोलीस ठाण्यावर महिला मोर्चा नेवू
या गंभीर घटनेला पंधरा दिवसाहून अधिक अवधी उलटून देखील पोलिसांनी तपासाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही.लवकरात लवकर आरोपीचा शोध न लागल्यास गावातील महिलांना घेवून लोणी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा माजी सरपंच श्री. आठरे यांच्या सूनबाई हर्षदा आठरे यांनी दिला आहे.

हल्ल्यातील अ‍ॅसिडचे नमुने नाशिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहे. त्यांचा अहवाल अजूनही प्राप्त झालेला नाही. याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. हे केमिकल्स आरोपींनी गावातून घेतले का? घेतले असेल तर कोठून घेतले, असे प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, येथे कोणतीही संशयास्पद वस्तू मिळून आलेली नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Accident News : वनविभागाचे वाहन व ट्रॅक्टरची धडक

0
घारी |वार्ताहर| Ghari कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील भैरवनाथ मंदिराजवळ बाजारचे दिवशी शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास वनविभागाच्या वाहनाने एका ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली. वनविभागाचे वाहन...