Thursday, October 22, 2026
Homeनगरकोपरगावात कांतीलाल हरलाल जोशी पेढीवर एफडीएची धाड; १.१८ लाखांचा गूळ जप्त

कोपरगावात कांतीलाल हरलाल जोशी पेढीवर एफडीएची धाड; १.१८ लाखांचा गूळ जप्त

कोपरगाव (प्रतिनिधी)

सण उत्सवांच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने उघडलेले युद्ध अधिक तीव्र केले आहे. गुरुवारी (१७सप्टेंबर) एफडीएच्या पथकाने कोपरगाव येथील मे. कांतीलाल हरलाल जोशी या प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या पेढीवर थेट छापा टाकत १ लाख १८ हजार १९५ रुपये किमतीचा तब्बल २,१४९ किलो संशयास्पद गूळ जप्त केला. सणासुदीच्या काळात झालेल्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील भेसळदार आणि नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

- Advertisement -

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, नाशिक विभागाचे सह-आयुक्त एम. यू. माने आणि सहाय्यक आयुक्त ए. ए भोईते यांच्या थेट आदेशावरून ही धडक मोहीम राबवण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी किरण जगदाळे व सहाय्यक आयुक्त ए. ए. भोईते यांच्या पथकाने कोपरगाव येथील संबंधित आवारावर अचानक धाड टाकली. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांची पायमल्ली करून अत्यंत अस्वच्छ आणि नियमबाह्य वातावरणात गुळाची साठवणूक केल्याचे उघडकीस आले. हा गूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचा व आरोग्यास घातक असण्याची तीव्र शक्यता असल्याने पथकाने २,१४९ किग्रॅचा साठा जागीच जप्त केला. या साठ्यातून अन्नाचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवाल येताच दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 12 जागांसाठी उमेदवार जिल्हा बँकेच्या आखाड्यात; कोण कोण झाले...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालक मंडळाच्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत बुधवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणूूक बिनविरोधचा फुसका बार फुसका ठरला....