धुळे । प्रतिनिधी dhule
भरधाव कार (car) अंगावर येत असल्याने घाबरून दुचाकी रस्त्यांच्या कडेला घेतांना तोल गेल्याने मागे बसलेली महिला खाली पडून ठार झाली. काल सकाळी हा अपघात (accident) झाला.
याबाबत पोलिसात (police) नोंद करण्यात आली आहे. मिराबाई दिलीप भदाणे (वय 61 रा.वारुळ ता.शिंदखेडा) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या सकाळी 11 वाजेच्या सुमारास पुतण्या सुधाकर साहेबराव भदाणे (वय 32 रा. वारुळ) यांच्यासोबत दुचाकीवर मागे बसून नरडाणाहुन वारुळ येथे घरी जात होत्या. त्यादरम्यान वारुळ गावापासुन एक किमी अंतरावर एका वळणावर अचानक एक कार भरधाव वेगाने आपल्या अंगावर येत असल्याचे वाटत्याने घाबरुन सुधाकर हा दुचाकी रस्त्याच्या कडेला घेत असतांना त्याचा तोल गेला. त्यामुळे मागे बसलेली त्याची काकु मिराबाई या खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला मार
लागल्याने त्यांना नातेवाईकांच्या मदतीने तत्काळ नरडाणा ग्रामीण रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल केले. तेथील डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचारासाठी हिरे वैद्यकीय महविद्यालयात हलविले. उपचार सुरू असतांना दुपारी 2 वाजता मिराबाई भदाणे यांचा मृत्यू झाला.